[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट, जतिन सिंग: मध्य आणि पूर्व भारतात सक्रिय मान्सूनची स्थिती, दिल्ली-एनसीआरमध्ये आठवड्याच्या पूर्वार्धात हलक्या पावसाची शक्यता, आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात मुंबईत नियमित पाऊस पडण्याची शक्यता, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सप्टेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून सुरुवात

September 9, 2019 4:15 PM |

Monsoon in India

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रायलसीमा आणि तामिळनाडू वगळता देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात मान्सून सक्रिय होता. सौराष्ट्र-कच्छ, मराठवाडा, कोकण-गोवा, कर्नाटक किनारपट्टी, केरळ आणि तेलंगाणात चांगला पाऊस झाला. मात्र ईशान्य-भारतासह गंगेच्या खोऱ्यातील मैदानी भागात पावसाची कामगिरी चांगली नव्हती.

स्कायमेटकडे असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार १ जून ते ८ सप्टेंबर या कालावधीत, देशात ७६४.५ मिमी सामान्य पावसाच्या तुलनेत ७८२ मिमी पाऊस पडला आहे. एकोणीस टक्क्यांच्या अधिशेषासह मध्य भारत हा मुख्य लाभार्थी राहिला. चांगला पाऊस पडल्यानंतर दक्षिण द्वीपकल्पात फक्त एका आठवड्यात ४ टक्क्यांनी वाढ होऊन आता ११ टक्के पावसाचे आधिक्य आहे. पूर्व आणि ईशान्य भारत हा पावसापासून सर्वाधिक वंचित असलेला प्रदेश असून इथली कमतरता २० टक्के इतकी आहे.

मध्य आणि पूर्व भारतात सक्रिय मान्सूनची स्थिती

मध्य आणि पूर्व भारतात सक्रिय मान्सूनची परिस्थिती अनुभवली जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये चांगला पाऊस पडेल. गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील नाकारता येत नाही.

आठवड्याच्या उत्तरार्धात उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारमध्येही चांगल्या पावसाची शक्यता असून पूर्व राजस्थान, उत्तर मध्यप्रदेश आणि दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात मुसळधार पावसाची नोंद होण्याची अपेक्षा आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी मध्यम सरींची अपेक्षा आहे. परंतु दिल्ली आणि एनसीआरमध्ये विखुरलेला पाऊस राहील.

दक्षिण द्वीपकल्पात हलका-मध्यम पाऊस पडेल. रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये सर्वात कमी पावसाळी गतिविधी अपेक्षित आहे. चेन्नईमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी असून वातावरण उष्ण व दमात राहण्याची शक्यता आहे.

साधारणत: पश्चिम घाटावर अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता असते. कोकण आणि गोव्यात आठवड्याच्या शेवटी मध्यम पावसाची नोंद होईल. या भागात तुरळक मुसळधार सरींची शक्यताही नाकारता येत नाही.

ईशान्य भारतात मध्यम पावसाची नोंद होईल. तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये बहुतांशी कोरड्या हवामानाची परिस्थिती असेल. साधारणतपणे मान्सून १ सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला सुरवात करतो. तथापि, या हंगामात सप्टेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून परतीला सुरू होईल.

मुंबईत आठवड्याच्या पूर्वार्धात नियमित पाऊस

मुंबईकरांना २ सप्टेंबरपासून सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा अनुभव आला. या मुसळधार पावसाने केवळ तीन दिवसात मासिक सरासरी ओलांडली. आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात नियमित पाऊस पडण्याची शक्यता असून आठवड्याच्या शेवटी जोर वाढू शकतो.

पिकांवर परिणाम

बहुतेक पिके फुल ते फळधारणेच्या टप्प्यावर असतात. आता अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे कारण यामुळे फुलं गळून पडण्याची शक्यता असते. मातीतला जास्त ओलावा देखील पिकांचे नुकसान करू शकतो. तथापि, या टप्प्यात हलका ते मध्यम पाऊस पिकांंसाठी अधिक फायदेशीर आहे. हीच वेळ आहे जेव्हा कीटक आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील झपाट्याने पसरतो म्हणून पिकांवर बारीक नजर ठेवली पाहिजे आणि कीड लागल्यास ताबडतोब उपचारात्मक कारवाई केली पाहिजे.

Image Credits – Hindustan Times 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest StoriesWeather on Twitter
#Hindi: 14 और 15 नवंबर को भी कई स्थानों पर मध्यम से भारी बारिश की संभावना है। साथ ही, इस दौरान उत्तराखंड की ऊंची प… t.co/tYDrVxb2h8
Wednesday, November 13 21:00Reply
Wednesday, November 13 20:45Reply
#Snow is all set to lash many parts of #UnitedKingdom. #Snowfall t.co/miSavZ4vXk
Wednesday, November 13 20:30Reply
#Hindi: स्काइमेट का आंकलन है कि दिल्ली-एनसीआर में 14 और 15 नवंबर को स्थिति और ख़राब हो सकती है। #DelhiChokest.co/6pdJWhr5I8
Wednesday, November 13 20:00Reply
अगले 24 से 48 घंटों के दौरान गुजरात के कच्छ और सौराष्ट्र क्षेत्रों में कुछ स्थानों पर बारिश होने की संभावना है 15 न… t.co/lz6XK01zPy
Wednesday, November 13 19:45Reply
On November 14 and 15, we can expect fairly widespread moderate to heavy #snowfall over #JammuandKashmir,… t.co/lasPIWSKhV
Wednesday, November 13 19:30Reply
#Hindi: आज अधिकांश जगा हो पर प्रदूषण का स्तर सीवियर कैटेगरी कैटेगरी में बना हुआ है अब अगले 24 घंटों के दौरान हवा… t.co/6kOOj8eYMq
Wednesday, November 13 19:15Reply
#Hindi: After a period of subdued rains, #NortheastMonsoon is set to revive once again over #SouthIndia. Good… t.co/ds2ZM3wHgG
Wednesday, November 13 18:45Reply
#Hindi: दिल्ली तथा एनसीआर के अधिकाँश इलाकों में प्रदुषण खतरनाक स्तर पर। पराली का धुआँ, हल्की हवा तथा स्थानीय प्रदुष… t.co/H55qgDGfBh
Wednesday, November 13 18:15Reply
#Hindi: उत्तर पूर्वी हवाओं का सामान्य पैटर्न एक बार फिर से आ जाएगा। हम उम्मीद करते हैं कि उत्तर पूर्वी मॉनसून एक बा… t.co/xaQ0RKEx9t
Wednesday, November 13 18:00Reply


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try