[Marathi] महाराष्ट्रातील काही भागात २४ तासात १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद, पुणे आणि मुंबईत पावसाचा जोर कायम

September 8, 2019 12:23 PM |

weather in Maharashtra

मागील चोवीस तासांच्या कालावधीत गोंदियामध्ये २०8 मिमी, तर वेंगुर्ला येथे १५९ मिमी, महाबळेश्वर १४७ मिमी, डहाणू १४६ मिमी, अलिबाग १२७ मिमी आणि मुंबईत ११९ मिमी पावसाची नोंद झाली.

गेल्या २४ तासात सक्रिय मान्सूनच्या लाटेमुळे कोकण आणि गोव्यासह विदर्भातील बर्‍याच भागात जोरदार ते अति मुसळधार सरी कोसळल्या. दरम्यान, याकाळात मध्य महाराष्ट्रात गडगडाटी हलका ते मध्यम पाऊस नोंदला गेला. परंतु, ओलावा नसल्यामुळे मराठवाडा विभागात मात्र वातावरण जवळपास कोरडे व उबदार राहिले.

या चांगल्या पावसाचे श्रेय दक्षिण गुजरात ते केरळ पर्यंत किनारपट्टीलगत विस्तारलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला दिले जाऊ शकते. शिवाय ओडिशा प्रदेशातील कमी-दाबाचे क्षेत्र हळूहळू पश्चिम / वायव्य दिशेने सरकत आहे.

ही प्रणाली आणखी काही काळ कायम राहण्याची अपेक्षा असल्याने कोकण आणि गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बर्‍याच भागात पुढील ४८ तासांत मध्यम सरी सुरूच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या २४ ते ३६ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर, हि प्रणाली कमकुवत होईल व पावसाळी गतिविधींमध्ये लक्षणीय घट होईल. या संपूर्ण काळात, पुरेसा ओलावा नसल्याने मराठवाड्यात मात्र कोरडे व उबदार हवामान राहील.

प्रामुख्याने मुंबई, ठाणे, कुलाबा, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, महाबळेश्वर, नागपूर, गोंदिया, अकोला, अमरावती इत्यादी ठिकाणी मध्यम तर डहाणू, जळगाव आणि नाशिक मध्ये काही ठिकाणी आणखी ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान १ जून ते ७ सप्टेंबर दरम्यानच्या पावसाच्या आकडेवारीनुसार सातत्याने चांगला पाऊस झाल्यामुळे कोकण आणि गोवा येथे ४६ टक्के, तर विदर्भात ३ टक्के आणि मध्य महाराष्ट्रात ५३ टक्के पावसाचे आधिक्य आहे. याउलट, चांगला पाऊस नसतानाही मराठवाड्यात ७ सप्टेंबरपर्यंत पावसाची कमतरता १८ टक्के आहे.

Image Credits – AccuWeather 

Any information taken from here should be credited to Skymet Weather


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories
Weather on Twitter
During the next 2 days light to moderate showers with one or two intense spell are likely over #TamilNadu, south co… t.co/RmQuywMCrZ
Tuesday, November 19 18:15Reply
Another #WesternDisturbance would approach the region around November 25, which would further trigger rain and snow… t.co/hk5zTPQA5w
Tuesday, November 19 18:05Reply
One of these Western Disturbances would approach between November 20 and 22 and bring good #rain and #snowfall in… t.co/8s0gpb2mrg
Tuesday, November 19 18:00Reply
दक्षिण कोंकण व गोव्यात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. मुंबईत हवामान उ… t.co/smiXsFxOIT
Tuesday, November 19 17:45Reply
सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे मध्यम ते जोरदार हिमवर्षाव होतो आणि हा ताजा बर्फ कधीकधी हिमस्खलनास कारणीभूत ठरतो. काल सि… t.co/dCjw2ZBNkB
Tuesday, November 19 17:30Reply
From November 21 and November 22 pollution will increase once again to very poor to severe category. But from Novem… t.co/cURdZrv025
Tuesday, November 19 17:15Reply
As November finishes half of its journey, more snow days are all set to make an appearance in #Britain. In fact, it… t.co/I1ZfgoRPaR
Tuesday, November 19 17:00Reply
दुनिया के सबसे ऊंचे युद्धक्षेत्र सियाचिन में उत्तरी ग्लेशियर के पास सोमवार को हुए हिमस्खलन में सेना के 4 जवानों समे… t.co/7UAcK5XTAp
Tuesday, November 19 16:39Reply
दक्षिण आंध्र प्रदेश, तमिल नाडु और केरल में तेज बारिश | तेलंगाना और कर्नाटक के अधिंकाश भागो का मौसम रहेगा शुष्क | चे… t.co/sqo1Y9dohd
Tuesday, November 19 16:15Reply
Today morning Safdarjung Observatory recorded a minimum at 12.3 degrees and has seen a significant three-degree dro… t.co/i1EvRq7lRc
Tuesday, November 19 16:08Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try