[Marathi] महिन्यातील उर्वरित दिवसांत मुंबईत तुरळक मध्यम सरींसह हलका पाऊस; जोरदार पावसाची शक्यता नाही

August 23, 2019 2:54 PM |

rain in Mumbai

गेल्या २४ तासात मुंबईमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला असून कुलाबामध्ये ६ मिमी, तर सांताक्रूझमध्ये फक्त ०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असताना उर्वरित महिन्यात नेहमीप्रमाणे जोरदार पावसाची शक्यता नसून तुरळक मध्यम सरींसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

मान्सूनचा पहिला अर्धा हंगाम मुंबईसाठी चांगला ठरला असून मुंबईत जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला. तर जुलै महिन्यात इतका मुसळधार पाऊस पडला कि अवघ्या काही मिमी पावसाच्या अभावामुळे पावसाचा विक्रम मोडायचा राहिला.

त्याचप्रमाणे, ऑगस्टची सुरुवातही दमदार पावसाने झाली असून पहिल्या पाच दिवसात तीन अंकी पाऊस नोंदला गेला. तथापि, त्यानंतर शहरात पावसाची तीव्रता कमी झाली. वास्तविक मुंबईमध्ये ६ ऑगस्ट पासून दोन अंकी पावसाचीसुद्धा नोंद झाली नाही तर काही दिवस पूर्णपणे कोरडेच राहिले.

ऑगस्ट महिन्यात मुंबईत सामान्य ५८५ मिमी पावसाच्या तुलनेत ३२१ मिमी पावसाची नोंद झाली. महिना संपण्यास आता फक्त एक आठवडा शिल्लक आहे, त्यामुळे पाऊस हे लक्ष्य गाठेल अशी आशा नाही.

पुढील ४८ तासातही मुंबईमध्ये पाऊस हलका राहील. महिन्याच्या अखेरीस काही मध्यम सरींची शक्यता असली तरी तूट भरून काढण्यासाठी हे पुरेसे ठरणार नाही.

सर्वसाधारणपणे, मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या काळात पाऊस सक्रिय राहतो. मान्सूनपूर्व मे महिन्यातदेखील काही ठिकाणी पाऊस पडतो. त्याचप्रमाणे

मॉन्सूनच्या अखेरीस ऑक्टोबरमध्ये देखील काही ठिकाणी हलका पाऊस पडतो. तथापि, नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या कालावधीत वातावरण पूर्णपणे कोरडे असते.

मान्सूनच्या चार महिन्यांपैकी जून आणि जुलै महिन्यात पाऊस समाधानकारक राहिला आहे.ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. आता सप्टेंबर मध्ये पावसाचे प्रमाण काय आहे हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. आता उर्वरित ऑगस्ट महिन्यात जोरदार पावसाची शक्यता नाही. मुंबईकर नेहमीप्रमाणे ऑगस्ट मधील जोरदार पावसाचा अनुभव यंदा घेऊ शकणार नाहीत.

Image Credits – Zee Business 

Any information taken from here should be credited to Skymet Weather


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
21 सितंबर मॉनसून पूर्वानुमान: दक्षिणी गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ में अच्छी बारिश की उम्मीद:… t.co/jNERJETGqo
Friday, September 20 18:17Reply
The remnants of Cyclonic Circulation would continue to give scattered #rains in #Nagpur, Chandrapur, Parbhani, Nand… t.co/0bfg9KL1pk
Friday, September 20 18:00Reply
क्या मॉनसून मध्य प्रदेश से विदा नहीं होगा ? t.co/z2eK9h5uZD #Hindi #Monsoon #MadhyaPradesh
Friday, September 20 17:44Reply
We expect moderate showers with one or two heavy spells to continue over the states of #AndhraPradesh and… t.co/ieL1LyD0S9
Friday, September 20 17:27Reply
@Anil_G_Patel गलती हो गई थी सर, सुधार हो गया है।
Friday, September 20 17:24Reply
RT @Mpalawat: Parts of #Ahmedabad and #GandhiNagar in #Gujarat and #Dungarpur in #Rajasthan may get #rain and #Thundershowers any time soo…
Friday, September 20 17:22Reply
@semubhatt Someone took care of that!
Friday, September 20 17:21Reply
@summitkhanna @InfoGujarat Rectified. Apologies for the error
Friday, September 20 17:19Reply
[Marathi] नागपूर, मुंबई, पुणे, रत्नागिरी येथे विखुरलेल्या पावसाची शक्यता : t.co/jnKRnlJLRp #Mumbai #Nagpur #Pune #Ratnagiri
Friday, September 20 16:44Reply
@summitkhanna @InfoGujarat Sir, thanks for pointing this. We have rectified the mistake.
Friday, September 20 16:35Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try