[Marathi] येत्या ४८ तासांत मुंबईत विजांच्या गडगडाटासह तुरळक ते तीव्र पावसाच्या सरींची शक्यता

October 10, 2019 12:11 PM |

Mumbai weather

दसऱ्याच्या संध्याकाळी मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे शहरातील अनेक भागांत व उपनगरामध्ये सखल भागात पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. मात्र, गेल्या २४ तासांत मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असून शहर व आसपासच्या भागात केवळ हलक्या सरींची नोंद झाली.

स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, पुढील ४८ तासांत शहरात काही तीव्र सरींसह तुरळक पावसाची शक्यता आहे. याकाळात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तथापि, अति मुसळधार पाऊस परतण्याची शक्यता नाही.

दरम्यान मध्य महाराष्ट्रावर असलेले चक्रवाती परिभ्रमण आता कोकण किनारपट्टीला लागून असलेल्या पूर्व अरबी समुद्राकडे सरकले आहे त्याच्या प्रभावामुळे ह्या पावसाची शक्यता आहे. तसेच, कमी दाबाचा पट्टा कर्नाटक किनारपट्टीपर्यंत विस्तारला आहे.

ही प्रणाली आणखी काही काळ टिकून राहण्याची शक्यता असल्याने मुंबई व उपनगरामध्ये काही मुसळधार सरी पडण्याची शक्यता आहे, तथापि, हा पाऊस लागून राहणार नसून तुरळक ठिकाणी आणि बहुतांशी स्थानिक स्वरूपाचा असेल.

शिवाय, शहरातील सर्वच भागात एकाच वेळी पाऊस पडण्याची शक्यता नाही. दरम्यान एकीकडे शहराच्या काही भागात पावसाच्या तीव्र गतिविधी दिसून येतील आणि दुसरीकडे मात्र हवामान कोरडे राहील.

साधारणत: जेव्हा मान्सून परतीच्या अवस्थेत असतो, तेव्हा देशाच्या बर्‍याच भागात पावसाळी गतिविधी वाढतात आणि सध्या हीच परिस्थिती आहे. मान्सूनपूर्व हंगामातही अशीच परिस्थिती दिसून येते ज्यात ढगांचा वाढ होऊन काही चांगल्या सरी होतात.

Image Credits – Bel-India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
Pollution in Delhi has seen a marginal increase in last 24 hours. Although, the stubble burning has not affected De… t.co/LZV7RNtcf1
Thursday, October 10 11:36Reply
During the next 24 hours, scattered light to moderate rains are possible over #Konkan and #Goa, Madhya #Maharashtrat.co/hICVyxtLwL
Thursday, October 10 10:41Reply
It looks like the plans of the #rain gods are to cause major disruptions in the second #testmatch #puneraint.co/pCG13POYGq
Thursday, October 10 09:32Reply
There are chances of on and off patchy #Rainfall activities coupled with a few intense spells during the next 48 ho… t.co/C5vh0IVaay
Thursday, October 10 08:59Reply
50 #trees #collapsed in #Pune in view of inclement #weather while one bus driver lost his life after he parked a se… t.co/DeRxaCAQ8Q
Thursday, October 10 08:46Reply
#WeatherForecast Oct 10: Retreating of #Monsoon commences from #Rajasthan, rain in #Kolkata, #Ranchi t.co/or5MqHQy8b
Wednesday, October 09 21:45Reply
#PuneRains: In the last 12 hours, #Pune has recorded 21 mm of #rains. Expect more showers ahead.
Wednesday, October 09 21:17Reply
10 अक्टूबर का मौसम पूर्वानुमान: छत्तीसगढ़, महाराष्ट्र, मुंबई व गोवा में हल्की से मध्यम बारिशI #Hindit.co/vqLI2Rjwkc
Wednesday, October 09 21:15Reply
ਤਾਮਿਲ ਨਾਦੁ, ਕੇਰਲ ਤੇ ਕਰਨਾਟਕ ਵਿਚ ਹਲਕੀ ਤੋਂ ਮਾਧਿਅਮ ਬਾਰਿਸ਼ ਦੀ ਉਮੀਦ। ਮਧ੍ਯ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਕੁਛ ਇਲਾਕਿਆਂ ਵਿਚ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ ਕਾਫੀ… t.co/hlVppBSJgy
Wednesday, October 09 20:45Reply
पश्चिम बंगाल, झारखंड और ओडिशा में अच्छी वर्षा | #Hindi #Jharkhand #WestBengal #Odisha t.co/2Vl7JsunBG
Wednesday, October 09 20:15Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try