Skymet weather

[Marathi] नागपूर व अकोला येथे मध्यम तर मुंबई, पुणे, ठाणे व डहाणू येथे हलक्या पावसाची शक्यता

August 23, 2019 5:32 PM |

Maharashtra rains

विदर्भात पुन्हा एकदा पावसाच्या तीव्रतेत वाढ झाली असून पूर्वेकडील भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. पुढील २४ तासांत नागपूर व अकोला येथेही अशीच स्थिती येणार असून काही मुसळधार सरींसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

याउलट मुंबई व पुणे येथे हलका पाऊस पडेल. पावसाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास गुरुवार सकाळी साडेआठ पासून चंद्रपूरमध्ये ४१.५ मिमी, गडचिरोलीमध्ये २४.८ मिमी आणि ब्रम्हपुरीमध्ये २३.८ मिमी पाऊस पडला.

या काळात मराठवाड्यातही मध्यम पावसाची नोंद झाली असून नांदेड येथे ११ मिमी पाऊस पडला. या उलट मुंबईसह उत्तर कोकण आणि गोवा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

सध्या एक चक्रवाती परिभ्रमण पूर्व विदर्भात मध्यम पातळीवर आहे. या प्रणालीमुळे येत्या २४ तासांत विदर्भातील नागपूर व अकोला या ठिकाणी एक किंवा दोन मुसळधार सरींसह मध्यम पावसाची शक्यता असून मराठवाड्यात हलका पावसाची अपेक्षा आहे. या प्रणालीमुळे पुढील २४ ते ४८ तासात दक्षिण कोकण आणि गोवा येथेही चांगला पाऊस पडेल.

परंतु आणखी दोन दिवस मुंबई, पुणे, डहाणू आणि ठाणे येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवापर्यंत, विदर्भामध्ये पावसाची तीव्रता कमी होईल आणि काही भागात विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. या काळात उत्तर मध्य महाराष्ट्रातही काही गतिविधी दिसून येतील ज्यात जळगाव व लगतच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

Image Credits – Times of India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather







For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories






latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×