Skymet weather

[Marathi] मुंबईत येणाऱ्या दिवसात पावसाची कोणतीही शक्यता नाही

May 7, 2019 5:13 PM |

Mumbai weather

डिसेंबर महिन्या पासून ते एप्रिल महिन्या पर्येन्त, मुंबईतील हवामान मात्र कोरडेच राहिले. मुंबई शहरात पावसाची सुरुवात मे च्या दुसरा आठवड्या पर्येन्त होते व जून महिन्या पर्येन्त पावसाचा जोर वाढतो. मे महिन्यात सरासरी पाऊस ११ मिलीमीटर, व जून महिन्यात हि संख्या ५०० मिलीमीटर होते.

या हंगामा बद्दल सांगायचे तर, मार्च महिना सामान्यपेक्षा गरम अनुभवला गेला. २५ मार्च ला कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. या उलट, एप्रिल महिना आटोक्यात राहिला, आणि कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस २७ एप्रिल ला नोंदवला गेला.

मे महिन्याच्या सुरवाती पासून, तापमान सामन्यचा जवळपास राहिले. कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस व किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअसच्या जवळपास नोंदवले गेले.

आमची अशी अपेक्षा आहे कि येणाऱ्या दिवसात पण स्थिती अशीच कायम राहणार. पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींना सध्या वेळ असून, येणाऱ्या दिवसात हवामान कोरडेच राहणे अपेक्षित आहे. असा म्हणू शकतो कि मुंबईकरांना पावसा साठी सध्या आणखीन प्रतीक्षा करावी लागेल.

इंग्रेजीत वाचा: IPL 2019: Humid Chennai to host qualifier 1 between MI and CSK

स्कायमेटच्या अंदाजानुसार, दुपारच्या वेळी ढगाळ आकाशासह हवामान कोरडे राहील व संध्याकाळी चालणाऱ्या  वाऱ्यांमुळे हवामान आनंददायी होईल. या शिवाय, सध्या येणाऱ्या १ आठवड्या ते १० दिवसात, पावसाची कोणतीही गतिविधी नाही दिसून येईल. पावसाची शक्यात मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात सध्या दिसून येत आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try