Skymet weather

[Marathi] पंजाब आणि हरियाणा मध्ये पूर्व मॉन्सूनचा पाऊस सुरु राहील

May 15, 2019 12:01 PM |

rain in punjab and haryana

स्कायमेटच्या अंदाजानुसार, १५ मे ला हरियाणा आणि पंजाब मध्ये पावसाचा जोर वाढून, बऱ्याच भागात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

खरं तर, हरियाणातील बहुतांश भाग जसे फतेहबाद, सिरसा, भिवानी, जिंद, रोहतक, सोनिपत आणि पानीपत, येथे चांगल्या पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींची नोंद करण्यात आलेली आहे. याशिवाय, दक्षिण हरियाणाच्या एक दोन ठिकाणी जसे रोहतक मध्ये गारपीट पण अनुभवले गेले आहे.

याशिवाय, गेल्या काही दिवसांपासून, दोन्ही राज्यातील बऱ्याच भागात पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी चालू आहे, ज्यामुळे दोन्ही राज्यांच्या तापमानात देखील लक्षणीय घट नोंदवण्यात आलेली आहे. येथे सध्या तापमान सामान्यच्या जवळ नोंदवले जात आहे. हरियाणा राज्यात तापमान ४० अंशाचा खाली नोंदवला जात आहे.

आमची अशी अपेक्षा आहे आज पावसाचा जोर दोन्ही राज्यांवर आणखीन वाढणार. एक दोन ठिकाणी गारपीट पडू शकतो, असा सुद्धा दिसून येत आहे.

Also read in English: Pre-Monsoon rains in Punjab and Haryana to continue, hailstorm to occur in parts

पंजाब आणि हरियाणाचे भाग जसे अमृतसर, जालंधर, भटिंडा, पटियाला, चंदीगड, मोहाली, तसेच हरियाणा मधील भाग जसे फतेहबाद, सिरसा, भिवानी, जिंद, रोहतक, सोनिपत आणि पानीपत, येथे चांगल्या पूर्व मॉन्सूनच्या पावसाची शक्यात दिसून येत आहे.

संपूर्ण भारतावर बनलेली विविध हवामान प्रणाली

होणाऱ्या पावसाचे कारण आहे संपूर्ण भारतावर बनलेली विविध हवामान प्रणाली. सध्या, एका नंतर एक पश्चिमी विक्षोभ उत्तर भारताला प्रभावित करत आहे. त्याच्या प्रभावाने उत्तर पश्चिम भारतावर चक्रवर्ती परिस्थिती बनलेली आहे.

आमची अशी अपेक्षा आहे कि येणाऱ्या तीन ते चार दिवसात, दोन्ही राज्यात तापमान सामान्यच्या खाली बनलेले राहतील ज्यामुळे दोन्ही राज्यात हवामानाची परिस्थिती आरामदायक होईल व दोन्ही राज्यातील रहिवाशांना प्रचंड गर्मी पासून सुटका मिळेल.For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×