[Marathi] काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड मध्ये पाऊस सुरु राहणे अपेक्षित

May 17, 2019 10:06 AM |

Hills rains

एक पश्चिमी विक्षोभ जम्मू आणि काश्मीरवर बनलेला आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय, एक दोन ठिकाणी बर्फवृष्टीची पण अपेक्षा आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. जोराच्या पावसाची शक्यता कमी आहे व एक दोन ठिकाणीच पावसाचा जोर किंचित जास्त राहील. एक दोन ठिकाणी भूस्खलन, अर्थात माती घसरून पडण्याची पण शक्यता आहे.

Also read in English: Another rainy day for Kashmir, Himachal and Uttarakhand, landslides likely

१८ मे च्या संध्याकाळ पर्यंत पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव जरा कमी होईल, ज्यामुळे हवामान सुद्धा स्पष्ट होणे सुरु होईल. परंतु, काही ठिकाणी हलका पाऊस पडत राहील.

त्यानंतर, २१ मे रोजी, एक दुसरा पश्चिमी विक्षोभ पश्चिम हिमालया जवळ पोहोचेल, ज्यामुळे परत एकदा जम्मू काश्मीरवर पावसाचा जोर वाढेल. २२ मे रोजी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड देखील पाऊस अनुभवतील. या कालावधीत, एका नंतर एक पश्चिमी विक्षोभ उत्तर भारताला प्रभावित करतील. २४ मे पर्यंत स्थिती अशीच कायम राहील. आमची अशी अपेक्षा आहे तिन्ही राज्यांवर पावसाची तीव्रता वाढ़ेल.

साधारणपणे, मार्च महिन्या पासूनच पश्चिमी विक्षिभाचा प्रभाव कमी होऊ लागतो. परंतु या वर्षी परिस्थितीत बदल दिसून आलेला आहे. जानेवारी पासून पश्चिमी विक्षोभ उत्तर भारताला प्रभावित करतो व मार्च येत्या प्रभाव कमी होऊ लागतो परंतु, या वर्षी एका नंतर एक पश्चिमी विक्षोभाने उत्तर भारतात हजेरी लावली आहे. आता पर्यंत हवामान प्रणाली उत्तर भारताला प्रभावित करत आहे.

सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे, येणाऱ्या दिवसात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये चांगल्या पावसाची नोंद करण्यात येईल व हवामान आनंददायी होईल.

तथापि, चारधाम यात्रेच्या यात्रेकरूंना आणि उत्तरेकडील पर्यटकांना भूस्खलनच्या स्वरूपात काही अडचण होऊ शकते.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories
Weather on Twitter
RT @SkymetAQI: We asked our followers whether #OddEven policy is effective and should be extended. Out of 350 responses, 43% people think t…
Saturday, November 16 23:59Reply
During the next 24 hours, #Chennai, #TamilNadu, and #Kerala are likely to witness light to moderate rainfall activi… t.co/6XRy5Wa0Nx
Saturday, November 16 22:00Reply
RT @SkymetHindi: Temperatures may fall by 2-3 degree Celcius and may get recorded below 10 degrees in parts of #Punjab, #Haryana and North…
Saturday, November 16 21:20Reply
RT @SkymetHindi: बेंगलुरु में हल्की बारिश तो चेन्नई में मध्यम बारिश आगे क्रम में है। दिल्ली प्रदूषण में अब हल्का सुधार होने का अनुमान है। #…
Saturday, November 16 21:19Reply
During the next 24 hours, northern Northeast states that of Assam, #Nagaland and Arunachal Pradesh will see good ra… t.co/c8toRd97tt
Saturday, November 16 19:52Reply
तमिलनाडु, आंध्र प्रदेश, केरल तथा दक्षिणी कर्नाटक में नार्थईस्ट मॉनसून की वर्षा जारी रहेगी, केरल तथा कर्णाटक के उत्त… t.co/s2uDlpK8Q5
Saturday, November 16 19:00Reply
अगले 24 घंटों के दौरान, बीकानेर, होशियारपुर, अमृतसर, सिरसा समेत राजस्थान, पंजाब व हरियाणा के पश्चिमी भागों में बारि… t.co/fESomIFzM9
Saturday, November 16 18:30Reply
RT @SkymetAQI: Even though the AQI for #Delhi has improved but still the current #AQI for Punjabi Bagh is around 350. Track #AirQuality and…
Saturday, November 16 18:08Reply
RT @SkymetAQI: Even though the AQI for #Delhi has improved but still the current #AQI near Jawaharlal Nehru stadium is over 400. Track #Air
Saturday, November 16 18:08Reply
RT @SkymetAQI: Even though the AQI for #Delhi has improved but still the current #AQI over Rohini is beyond 380. Track #AirQuality and #Ai
Saturday, November 16 18:08Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try