पूर्व बिहार पासून विदर्भ आणि तेलंगणामधून दक्षिण कर्नाटक पर्यंत विस्तारलेल्या ट्रफ रेषेमुळे राज्यात आगामी काळात पावसाची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसात पडलेल्या थोड्या पावसामुळे तापमानात किरकोळ घट झाली आहे. अनुकूल परिस्थितीमुळे राज्यात पुढील २४ ते ४८ तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आमच्या हवामान तज्ञांनुसार विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे, तसेच नागपूर, परभणी, लातूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांमध्येही पावसाची शक्यता आहे. खरं तर, आगामी २४ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्रावर एक किंवा दोन जोरदार सरींची शक्यता आहे.
याशिवाय, कोकण आणि गोवा मधून विस्तारलेल्या कमकुवत ट्रफ रेषेमुळे मुंबई,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,रायगड यांसारख्या किनारी जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहील. तसेच पुढील दोन दिवसांमध्ये या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये हलका पाऊस सुरू झालेला आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पावसाचा जोर जरी खूप कमी असला, तरी कोरड्या हवामानाच्या परिस्थितीशी लढण्यासाठी या पावसाची खूप गरज आहे.
विदर्भ आणि मराठवाडा मध्ये तापमानात किरकोळ घट झाली असली तरी गेल्या बऱ्याच दिवसांपासून या भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थिती आहे. खरं तर, येथे अद्याप तापमान ४० अंश किंवा त्यापेक्षा जास्त आहे. याउलट, कोकण आणि गोव्यातील बहुतेक भागांत तापमान ३० अंशाच्या दरम्यान नोंदविले जात आहे. शिवाय,येथील रहिवासी असह्य आणि आर्द्र हवामानाच्या परिस्थितीशी लढत आहेत. तथापि, आगामी पावसामुळे, महाराष्ट्रातील सर्व चार हवामान विभागांच्या तापमानात किरकोळ घट अपेक्षित आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे