Skymet weather

[Marathi] फक्त चारच दिवसांत पडलेल्या ३०० मिमी पेक्षा जास्त पावसामुळे पुण्याने केले मासिक सरासरीचे लक्ष्य पार

July 30, 2019 3:23 PM |

Pune weather

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुणे शहरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या चार दिवसांत पडलेल्या ३१५ मिमी पावसामुळे शहराने याआधीच आपल्या मासिक सरासरीचे १८७. २ मिमी पावसाचे लक्ष्य पार केले आहे. तथापि, १९०७ सालच्या जुलै महिन्यात पडलेल्या ५०८.५ मिमी पावसाचा विक्रम मोडण्यास आत्ताची पावसाची आकडेवारी खूपच कमी आहे.

गेल्या २४ तासात सोमवार सकाळी ८:३० पासून पुण्यात ३४.६ मिमी इतका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, नाशिक आणि जळगाव या शहरातही मुसळधार पाऊस झाला आहे.

स्कायमेटनुसार, आजही पुण्यात गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्यापर्यंत, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल मात्र मध्यम पावसाच्या काही सरींची शक्यता नाकारता येत नाही.

येत्या ३ ते ४ ऑगस्ट दरम्यान पश्चिम किनारपट्टीवरील नव्या मान्सून लाटेमुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडेल.

दरम्यान, पुढच्या आठवड्यात आणि त्यानंतरही वातावरण आल्हाददायक राहील आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे हवामान पूर्णपणे कोरडे होणार नाही. संपूर्ण आठवडाभर आकाश अंशतः किंवा पूर्णपणे ढगाळ राहील.

प्रतिमा क्रेडीट: मुंबई लाइव

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try