>  
[Marathi] १३ आणि १४ फेब्रुवारीला महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता

[Marathi] १३ आणि १४ फेब्रुवारीला महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता

12:55 PM

img1

सध्या, विदर्भातील बऱ्याच भागात थंडीचा कडाका अनुभवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून येथे शीत लहरी जाणवली जात आहे. दुसरीकडे, उत्तरी मध्य महाराष्ट्र आणि कोंकण व गोव्याचे तापमान सामान्यपेक्षा खूप कमी नोंदवण्यात आले आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, हवामानाच्या परिस्थितीत येणाऱ्या दिवसात बद्दल अपेक्षित आहे. कारण लवकरच दक्षिण पूर्व दिशेने उबदार वारे मराठवाडा आणि विदर्भावर वाहू लागतील, ज्यामुळे या भागात तापमान वाढण्याची अपेक्षा आहे॰ तापमान वाढण्यामुळे रहिवाशांना शीत लहरींपासून पण लवकरच सुटका मिळेल.

याउलट, मुंबई, पुणे, नाशिक आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागात येणाऱ्या दिवसात थंड वारे चालू राहील ज्यामुळे सध्यातरी या भागातील तापमान नाही वाढणार आणि येणाऱ्या दिवसात पण येथे तापमान सामान्यपेक्षा कमीच नोंदवले जातील.

दरम्यान, १३ फेब्रुवारीच्या आसपास दक्षिण पूर्व दिशेने उबदार वारे आणि उत्तरपश्चिम दिशेने कोरडे वारे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. १४ फेब्रुवारीपर्येंत हा पाऊस आणखीन वाढेल, आणि विदर्भासह मराठवाड्याच्या बऱ्याच भागातपर्येंत पोहोचेल. येथे मेघगर्जनेसह पाऊस आणि एक दोन ठिकाणी गारपीट पडेल, असे पण दिसून येत आहे.

पुढे, १५ फेब्रुआरीपर्येंत पावसाचा जोर कमी होईल आणि १७ फेब्रुवारी येता- येता हवामान पुन्हा एकदा कोरडे होईल.

मुंबईबद्दल सांगायचे तर, ९ फेब्रुवारीला येथे हंगामाचे सगळ्यात कमी कमाल तापमान २४.२ अंशावर नोंदवले गेले. परंतु १० फेब्रुवारीपासून तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली आणि आता तापमान ३२.२ अंशापर्येंत पोहोचले आहे, जे सामान्यपेक्षा १ अंश जास्त आहे. दुसरीकडे, किमान तापमान अजूनही सामान्यपेक्षा कमी असून, १५.४ अंश नोंदवले गेले आहे. पुढील ४ ते ५ दिवस, मुंबईतील रहिवाशांना थंड रात्र अनुभवण्यात येईल.

नागपूरमध्ये, किमान तापमान सामान्यपेक्षा ८ अंश कमी असून, ७.६ अंश नोंदाव्यात आला आहे. तसेच, दिवसाचे तापमान पण सामान्यपेक्षा ३ अंश कमी आहे. येणाऱ्या दिवसात, दक्षिण पूर्व दिशेने उबदार वारे पुण्यावर वाहतील, ज्यामुळे येथे १४ आणि १५ फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच, पुणे आणि नाशिकचे तापमान पण वाढतील, ज्यामुळे रहिवाशांना शीत लहरीपासून काही काळ सुटका मिळेल.

Image Credits – Pinterest

Any information taken from here should be credited to Skymet Weathe

We do not rent, share, or exchange our customers name, locations, email addresses with anyone. We keep it in our database in case we need to contact you for confirming the weather at your location.