Skymet weather

[Marathi] १४ व १५ फेब्रुवारीला विदर्भात पावसाची शक्यता

February 13, 2019 4:14 PM |

Maharashtra weather

फेब्रुवारी महिन्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोंकण व गोव्यात १०० टक्के कमी पाऊस पडला आहे॰ दूसरीकडे, विदर्भात काही ठिकाणी विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे॰ येथे १८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे॰

स्कायमेटच्या अंदाजानुसार १४ व १५ फेब्रुवारीला विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे॰

सध्या, महाराष्ट्रातील बऱ्याच भागात जसे विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोंकण व गोव्याचे कमाल व किमान तापमान मागील दो ते तीन दिवसांपासून वाढले आहे॰ १ ते १० फेब्रुवारीच्या मध्ये , किमान तापमान ७ से ८ अंशाचामध्ये नोंदवले गेले होते, आणि कमाल तापमान २० से २४ अंशाचामध्ये नोंदवले जात होते॰ परंतु, त्यानंतर किमान तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली आहे॰ किमान तापमान ८ ते १० अंशानी वाढले आहे॰ तसेच, कमाल तापमानात पण ६ से ७ अंशाची वाढ दिसून आली आहे॰ सध्या, कमाल तापमान ३० अंशाचा आसपास पोहोचले आहे॰

स्कायमेटच्या अंदाजानुसर कमाल व किमान तापमान वाढण्याचे कारण आहे पूर्व व दक्षिण पूर्व दिशेने येणारे उबदार वारे॰ दरम्यान, येणाऱ्या दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोंकण व गोव्याचे हवामान कोरडे राहील, परंतु विदर्भात विकसित झालेल्या संगम क्षेत्रेमुले, काही ठिकाणी पाऊस पडेल॰

पुढील १४ व १५ फेब्रुवारीला अकोला, भंडारा, चंद्रपुर, गडचिलोरी, गोंदिया, नागपुर, नांदेड़, वर्धा, वाशीम, यवतमाळमध्ये पावसाची शक्यता आहे॰ एक दोन ठिकाणी गारपीट पण पडेल, असे दिसून येत आहे॰

Image Credits – Pinterest

Any information taken from here should be credited to Skymet Weather


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories
The advantage of staying at home on a rainy day is that you can get comfortable, turn on your mobile, and get to play at a bitcoin casino with a cup of tea. While that heavy rain is falling, you get to play your favorite bitcoin casino games without any worry in the world. The advantage of playing in a crypto casino is that you can log in anywhere at any time.

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try