Skymet weather

[Marathi] २० ते २२ सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढेल

September 16, 2019 3:13 PM |

Maharashtra weather

२० ते २२ सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे.

कमी तीव्रतेसह कोकण आणि गोवा आणि मराठवाड्यातील काही भागांत गेल्या चोवीस तासांत चांगला पाऊस पडला. अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे, ज्यात कोकण आणि गोव्यातील काही भागांत पुढील २४ तासांत मध्यम सरी बरसतील. त्याचप्रमाणे मराठवाड्यात आणि विदर्भावर पुढील दोन दिवस काही चांगल्या सरींची शक्यता आहे.

रविवारी सकाळी साडेआठ वाजेपासून चोवीस तासांच्या कालावधीत रत्नागिरी येथे ३९ मिमी, त्यानंतर ठाणे ३१ मिमी, महाबळेश्वर २७ मिमी, अलिबाग २५ मिमी, हर्णै २० मिमी, कुलाबा १२ मिमी आणि सांताक्रूझ येथे ९ मिमी पाऊस झाला आहे.

आता, आम्ही मुंबईत हलका पाऊस पडण्याची अपेक्षा करतो तथापि, येणाऱ्या २४ तासांत काही ठिकाणी मध्यम सरी बरसतील. परंतु, मुसळधार पाऊस होण्याची सध्यातरी शक्यता नाही आहे.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली पश्चिम / दक्षिण पश्चिम दिशेने महाराष्ट्राच्या जवळ जाईल आणि २० आणि २२ सप्टेंबर दरम्यान राज्याच्या बर्‍याच भागांत पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढेल अशी आमची अपेक्षा आहे.

त्या काळात कोकण आणि गोव्यात पाऊस वाढेल. मुंबईत काही मुसळधार सरींची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचण्याची देखील शक्यता आहे.

तसेच, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे.

Image Credits – The Hindu Business Line 

Any information taken from here should be credited to Skymet WeatherFor accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories

When the weather outside is not the best and you cannot really enjoy your day due to climate situations out of your control, you usually search some alternatives to entertainment yourself and pass the time. We decided to help our readers in such situations and provide them with a different alternative, we turned to CasinoexpressIndia.com where Mr. Saiyaan provided us with a very comprehensive list of online casinos in India, all licensed and safe to play at. We decided to give it a try and it was quite entertaining and engaging, we found the casumo review to be quite accurate and it presents you with what you can expect as a new user. A single session playing there had us immersed for hours at a time.

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×