Skymet weather

[Marathi] मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात धुवाधार पाऊस

August 5, 2015 6:20 PM |

Wardha Rainमान्सून पर्वात देशातील बऱ्याच भागात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खूप जास्त पाऊस होत असतो. मासिक सरासरी सुद्धा या महिन्यात सर्वात जास्त असते. साधारणपणे सर्वच भागात भरपूर पाऊस होणे जरी अपेक्षित असले तरी या पावसाची तीव्रता सगळीकडे एकसारखी नसते.काही भागात जोरदार पाऊस होऊन मासिक सरासरीपेक्षा खूप जास्त असतो तर काही भागात कमी पाऊस होऊन तेथे तुटवडा निर्माण होतो. हे मान्सूनचे सर्वसाधारण गुणधर्म आहेत.
सध्या गेल्या २४ तासात मध्य भारताच्या आणि ईशान्येकडील बऱ्याच भागात जोरदार पाऊस होतो आहे. पण त्याबरोबरच इतर भाग कोरडेच आहेत किंवा तेथे अगदीच थोडा पाऊस होतो आहे.

स्कायमेट या संस्थेकडे असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि देशाच्या ईशान्येकडील भागात आसाम या ठिकाणी या हवामान प्रणालींची प्रमुख केंद्रे होती.

महाराष्ट्रातील पाऊस

मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला आणि अमरावती येथे रेकॉर्ड ब्रेकिंग पाऊस झालेला आहे. यवतमाळ येथे २२३ मिमी पाऊस झाला असून हा आकडा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे. याआधी ५ ऑगस्ट १९८१मध्ये १७१.१ मिमी पावसाची नोंद झाली होती.
अकोला येथेही गेल्या १० वर्षातील सर्वात जास्त पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत १८७.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या शहरात सर्वात जास्त पावसाची नोंद २२४.५ मिमी आहे. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात बुलढाणा येथेही १६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधीचा सर्वात जास्त पाऊस ७ ऑगस्ट २००६ मध्ये २४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षात आतापर्यंत फक्त दोन वेळच या शहरात तीन आकडी पावसाची नोंद झाली आहे.

वर्धा येथेही गेल्या दहा वर्षातील २४ तासात सर्वात जास्त पाऊस झाला असून १०५.५ मिमी अशी नोंद झाली आहे. या आधी ५ ऑगस्ट २००८ या दिवशी ९९.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. अमरावती येथेही १८४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची कमतरता असलेल्या विदर्भाला या पावसाच्या सरींमुळे बराच दिलासा मिळाला आहे.

मध्यप्रदेशातील पाऊस

मध्य प्रदेशातही काही भागात रेकॉर्ड ब्रेक करणारा पाऊस झाला आहे. मंग्वारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत इंदोर येथे १९१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.या पावसाने गेल्या दहा वर्षातील २४ ऑगस्ट २०११ ला झालेल्या १६८.४ मिमी पावसाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. तसेच १० ऑगस्ट १९८१ ला या शहरासाठी २१२.२ मिमी अशी सर्वात जास्त पावसाची नोंद झाली होती.
खांडवा येथेही प्रचंड जोरदार पाऊस झाला असून येथेही आतापर्यंतचा सर्वात जास्त पाऊस झाला आहे. तेथे २९० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आसाम मधील पाऊस

मान्सूनच्या काळात ईशान्य भारतातही भरपूर प्रमाणात पाऊस होतो. आणि आसाम हा त्या भागातील एक महत्वाचे क्षेत्र आहे.आसामच्या वरच्या बाजूला असलेला जोरहाट येथे मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात १२९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हि नोंद सुद्धा गेल्या १० वर्षातील सर्वात अधिक नोंद आहे. याआधी १४ ऑगस्ट २००६ ला ११९.२ मिमी पावसाची नोंद झाली होती.

 

Image Credit: The Hindu

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try