Skymet weather

[Marathi] हंगामातील पहिल्या हिमवृष्टीमुळे शिमल्यात सर्वदूर बर्फाचे आच्छादन, रोहतांग पास बंद

November 28, 2019 3:51 PM |

snow in hills

बद्रीनाथ, केदारनाथ आणि रोहतांग पास सह शिमला येथे गेल्या २४ तासांत या हंगामातील पहिली बर्फवृष्टी अनुभवण्यात आली. शीतलहर तीव्र झाल्याने डोंगराळ राज्यात थंडीने आपली पकड घट्ट केली आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात कमाल तापमान सामान्यपेक्षा ६ ते १० अंश सेल्सियस ने कमी नोंदले जात आहे. उत्तराखंडमध्येही आता कमाल तापमानात घट अनुभवण्यात येत आहे.

जोरदार हिमवृष्टीमुळे १३०५० फूट उंचीवर असलेल्या रोहतांग पास येथील वाहतुक बंद ठेवण्यात आली असल्यामुळे २४ नोव्हेंबरपासून लाहौल आणि स्पीतीच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्या आहे. किन्नौरमधील चितकुल गाव, पूह, सांगला, असरंग आणि कल्पा या उंच भागातील जिल्ह्यात बर्फाची दाट चादर अंथरली असून तापमान शून्यापेक्षा खाली घसरत आहे. गडद ढग आणि त्यानंतरच्या पावसामुळे कुफरी, मशोरबा, सिमला, नरकंडा आणि खरपथरमधील दृश्यमान पातळी कमी झाली आहेत.

स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जम्मू-काश्मीरमधील काझी गुंड आणि बनिहाल येथे चोवीस तासांच्या कालावधीत अनुक्रमे ५७ मिमी आणि ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पश्चिमी विक्षोभ हे या बर्फवृष्टीचे प्रमुख कारण मानले जाऊ शकते, जी लक्षणीय पाऊस आणि बर्फवृष्टी होण्यासाठी सलग चौथी सक्रिय प्रणाली ठरली आहे. ही प्रणाली दूर गेलेली असूनही, उत्तराखंडमध्ये आणखी २४ तास मध्यम ते जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी होत राहील. तथापि, आज दुपार पासून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये गतिविधी कमी होण्यास सुरुवात होईल.

Image Credits – The Statesman 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try