Skymet weather

[Marathi] लडाख, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल येथे हिमवर्षाव आणि पाऊस, वायव्येकडील मैदानी भागात लवकरच हिवाळ्यास सुरुवात

November 20, 2019 3:04 PM |

shimla snowfall

नोव्हेंबर महिन्यातील तिसरा सक्रिय पश्चिमी विक्षोभ जम्मू-काश्मीरजवळ येत आहे. त्यामुळे आज रात्री राज्यभर विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून पावसाळी गतिविधींची तीव्रता वाढेल आणि २१ ते २२ नोव्हेंबर दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख आणि २२ ते २३ नोव्हेंबर दरम्यान उत्तराखंडमध्ये एक ते दोन मुसळधार सरींसह पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याचा अंदाज आहे.

या काळात उत्तरेकडील सर्व डोंगरमाथ्यावर कमाल तापमानात घट होऊन दिवसा देखील वातावरण थंड होईल.

२३ नोव्हेंबरच्या आसपास पश्चिमी विक्षोभ पूर्वेला सरकल्याने जम्मू-काश्मीरमध्ये हवामान स्वच्छ होण्यास सुरवात होईल.

२१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान जोरदार हिमवृष्टीचा अंदाज असल्याने पुन्हा एकदा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आणि खोऱ्यातील इतर प्रमुख रस्ते बंद होवू शकतात. या डोंगराळ राज्यात प्रवास करताना पर्यटकांनी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. येत्या हिमवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने कोणत्याही अनुचित घटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था देखील केली पाहिजे.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील बऱ्याच भागात हिमस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जम्मू-काश्मीरमधील द्रास, गुरेझ, केरन, माछिल, पहलगाम, गुलमर्ग, नौगम आणि बनिहाल ही ठिकाणे हिमस्खलन प्रवण आहेत.

हिमाचल प्रदेशातही लाहौल आणि स्पीती, किन्नौर आणि कुल्लू ही ठिकाणे तर उत्तराखंडमध्ये चामोली हिमस्खलन प्रवण आहे.

याकाळात भूस्खलनाच्या घटनांची शक्यता देखील नाकारता येत नाही. २४ नोव्हेंबरपर्यंत हा पश्चिमी विक्षोभ पुढे सरकेल आणि २६-२७ नोव्हेंबरला आणखी एक सक्रिय पश्चिमी विक्षोभ पश्चिम हिमालयाला प्रभावित करेल. यामुळे २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर ते कुल्लू, मनाली, लाहौल आणि स्पीतीसह जवळपास सर्व ठिकाणी व्यापक स्वरूपात पाऊस आणि बर्फवृष्टी होईल.

त्याच वेळी ऊत्तरेकडील मैदानावर प्रेरित चक्राकार अभिसरण उपस्थित असेल. याकाळात पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात गडगडाटासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीटीची शक्यता देखील आहे.

Image Credits – DNA India 

Any information taken from here should be credited to Skymet WeatherFor accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×