>  
[Marathi] अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा येथे उद्या पावसाची शक्यता

[Marathi] अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा येथे उद्या पावसाची शक्यता

03:05 PM

Vidarbha rains

संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात हवामान कोरडे राहिले. खरं तर, कोंकण आणि मध्य महाराष्ट्रात किंचित पावसाची पण नोंद करण्यात आली नाही.

मराठवाड्यात फक्त ०.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, ज्यामुळे हे भाग ९५ टक्के कोरडे राहिले.

दुसरीकडे, विदर्भात फेब्रुवारी महिन्यात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे, येथे १२.३ मिलीमीटर पाऊस पडला, ज्यामुळे हे भाग फक्त २९ टक्केच कोरडे राहिले.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, उद्या एक संगम क्षेत्र विदर्भावर विकसित होईल, ज्यामुळे दक्षिण दिशेने उबदार वारे आणि उत्तर दिशेने थंड वारे मिळतील. संगम क्षेत्रेमुळे विदर्भात काही ठिकाणी उद्या आणि पर्वा पाऊस पडेल.

विदर्भातील भाग जसे, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक दोन ठिकाणी गारपीट पण होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, पावसामुळे कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट दिसून येईल, आणि ३० अंशाचा आसपास कमाल तापमान नोंदवले जातील.

गेल्या २४ तासात, अकोल्यात कमाल तापमान ३१.९ अंश नोंदाव्यात आले, तर किमान तापमान १५.८ अंश नोंदवले गेले. अमरावतीमध्ये, कमाल तापमान ३२.४ अंश, आणि किमान तापमान १४.८ अंश नोंदवले गेले. बुलढाणामध्ये कमाल तापमान २७ अंश, तर किमान तापमान १४.८ अंश नोंदवले गेले.

दुसरीकडे, चंद्रपूर शहरात कमाल तापमान ३४.६ अंश आणि किमान तापमान १७.२ अंश नोंदवण्यात आले. गोंदियामध्ये कमाल तापमान ३०.२ अंश व किमान तापमान १६ अंश नोंदवले गेले, तर नागपूरमध्ये कमाल तापमान ३१ अंश व किमान तापमान १४.७ अंश नोंदवण्यात आले.

याउलट , मराठवाडा, कोंकण आणि गोआ व मध्य महाराष्ट्राचे हवामान येणाऱ्या दिवसात पण कोरडेच राहणार आणि या ठिकाणी पाऊस पडण्याची सध्या तरी शक्यात दिसून येत नाही आहे.

Image Credits – Pinterest

Any information taken from here should be credited to Skymet Weather