>  
[Marathi] मुंबईसाठी आरामदायक आणि आनंददायी क्रिसमस

[Marathi] मुंबईसाठी आरामदायक आणि आनंददायी क्रिसमस

10:30 AM

mumbai night website

मुंबईच्या हवामानात आतापर्येन्त कोणताही बदल दिसून आलेला नाही आहे, आणि कोरडे हवामान अजूनही संपूर्ण शहरावर चालू आहेत. शिवाय, 15 डिसेंबरपासून मुंबईतील किमान तापमान सामन्यापेक्षा कमीच राहिले आहे, परंतु गेल्या 48 तासांत, किमान तापमानात 3 अंशानी वाढ दिसून आलेली  आहे.

सांताक्रूज वर नोंदवले गेले कमाल आणि किमान तापमान -

Capture marathi

दरम्यान, हवामानाच्या  परिस्थितीत हलका  बदल दिसून आला आहे. सध्या हवामानाने आपली दिशा बदलली आहे आणि दक्षिण-पूर्व दिशेनी आर्द्र वारे चालू आहे.

पुढील 24 तासात हवामानाची परिस्थिति अशीच राहणार आहे. त्यानंतर, 26 डिसेंबरच्या आसपास वारे पुन्हा एकदा बदलतील आणि किमान तापमानात 1 ते 2 अंशानी घट दिसून येईल। तसेच, कमाल तापमानत पण घट नोंदवली जाईल.

याशिवाय, आकाश स्पष्ट राहील आणि दिवसा उबदार वारे चालू राहील परंतु रात्री आणि दिवसाच्या वेळी थंडी अनुभवण्यात येईल.

ठाणे आणि डहाणुमध्ये पण अशीच स्थिति कायम राहणार. याशिवाय, गोंदिया, नागपुर आणि आसपासच्या भागात किमान तापमान 8 अंशाच्या आसपास नोंदवले जातील.पुढील आरामदायक रात्र आणि पावसाची कोणतीही शक्यता नसून, मुंबईकर आनंददायी क्रिसमस साजरा करतील.

Image Credits – Wikipedia

Any information taken from here should be credited to Skymet Weather