Skymet weather

[Marathi] कमी दाबाचा पट्ट्याच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे तामिळनाडू, केरळमध्ये जोराचे वारे वाहण्याची अपेक्षा

December 8, 2019 2:03 PM |

Depression in Arabian Sea

विषुववृत्तीय हिंद महासागर आणि लगतच्या दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर चक्रवाती परिभ्रमण होते. त्याच्या प्रभावामुळे, त्याच प्रदेशात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून आता अधिक तीव्र झाले आहे. सध्या हे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणपूर्व आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रामध्ये आहे.

पुढील २४ तासांत ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने जाईल आणि डिप्रेशन मध्ये रूपांतरित होईल अशी अपेक्षा आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अद्यापही २८ ते २९ अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने ह्या प्रणाली साठी समुद्राची परिस्थिती अनुकूल आहे. म्हणूनच, आम्ही अपेक्षा करतो की तीव्रतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु हि प्रणाली भारतीय किनाऱ्यापासून पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत राहील.

या हवामान प्रणालीमुळे भारतीय मुख्य भूमीसाठी धोका हा नगण्य आहे, परंतु या प्रणालीच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील पावसाळी गतिविधी कमी होण्याची अपेक्षा आहे. जेव्हा अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये कोणतीही हवामान प्रणाली विकसित होते तेव्हा त्या प्रणालीच्या आसपास आर्द्रता अधिक असते. यामुळे देशातील उर्वरित भागांमध्ये विशेषतः दक्षिण द्वीपकल्पात पावसाळी गतिविधींमध्ये अडथळा निर्माण होतो. कमीतकमी पुढील एक आठवडा तरी दक्षिण द्वीपकल्पात पावसाळी गतिविधी कमी होतील अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, पुढच्या ४८ तासांत दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळ किनारपट्टीवर ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.

Image Credits – Business Line 

Any information taken from here should be credited to Skymet Weather


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Storieslatest news

i
Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try