Skymet weather

[Marathi] मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला

September 17, 2019 4:37 PM |

Monsoon in India

सप्टेंबर महिना हा मान्सूनचा परतीचा महिना म्हणून ओळखला जातो आणि सामान्यपणे १ सप्टेंबरच्या आसपास पश्चिम राजस्थानपासून या प्रवासाला सुरुवात होते. कोणत्याही परिस्थितीत मान्सूनच्या परतीस १ सप्टेंबरपूर्वी सुरूवात होत नाही. बहुतेक वेळा, परतीस विलंब होते आणि सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीस सुरुवात होते.

या ठिकाणी आम्ही २०११ ते २०१८ पर्यंतच्या मान्सून परतण्याच्या तारखा नमूद करू इच्छितो. २०११ मध्ये २३ सप्टेंबरच्या सुमारास मान्सून माघारी जाण्यास सुरू झाली होती, २०१२ मध्ये २४ किंवा २५ सप्टेंबरच्या आसपास परतीस सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे २०१३ मध्ये, २३ ते २६ सप्टेंबर दरम्यान मान्सूनने माघारी जाण्यास सुरुवात केली होती.

मात्र २०१५ हे वर्ष अपवाद होते, या वर्षी मान्सूनने परतीस ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान सुरुवात केली होती जी सामान्य तारखेच्या अगदी जवळ होती. सन २०१६ मध्ये, परतीस सप्टेंबरच्या मध्यात सुरुवात झाली होती तर २०१७ आणि २०१८ मध्ये मान्सून २७ ते ३० सप्टेंबरच्या आसपास माघारी निघाला होता. म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की २०११ ते २०१८ च्या दरम्यान फक्त २०१५ हे वर्ष अपवाद होते, जेव्हा मान्सूनने १५ सप्टेंबरपूर्वी माघार घेतली होती. उर्वरित वर्षात, १५ सप्टेंबर नंतर मान्सूनची माघार सुरू झाली. सहसा, सप्टेंबरच्या अखेरीस, एकाच वेळी मोठ्या भागातून मान्सूनची माघार झालेली असते. यापूर्वी आम्ही २० सप्टेंबरच्या सुमारास मान्सून माघारी फिरण्याचा उल्लेख केला होता. मात्र, या शक्यतेत आणखी बदल झालेला आहे.

सलग ५ दिवस पावसाची अनुपस्थिती, वाऱ्यात बदल, प्रतिचक्रवात तयार होणे, आर्द्रता कमी होणे आणि तापमानात झालेली वाढ ह्या बाबी मान्सूनच्या माघारी जाण्याच्या प्रक्रियेतील मापदंड मानले जातात.

मध्यप्रदेश आणि त्याच्या आसपासच्या भागातील कमी दाबाचे क्षेत्र हे मध्य भारतातील मुसळधार पावसास जबाबदार आहे. त्यानंतर, बंगालच्या उपसागरामध्ये आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे जे पुन्हा एकदा मध्य भारतातून प्रवास करेल व त्यामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात पावसाची शक्यता असून राजस्थानातही पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या दोन प्रणालींच्या संयुक्त प्रभावामुळे वाऱ्यात बदल होऊन राजस्थानात पावसाची अपेक्षा आहे. आमच्या तज्ञांच्या मते, कमीतकमी ४८ तास ह्या प्रणालींचा आढावा घेणे आवश्यक असून त्यानंतरच चित्र आणखी स्पष्ट होईल. तोपर्यंत मान्सून माघारीच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब करणे योग्य होणार नाही. केवळ आम्हीच नाही तर काही इतर संस्थांनीही १५ ते २० सप्टेंबर दरम्यान कधीही मान्सूनच्या माघारी जाण्याविषयी उद्धृत केले आहे.

मात्र दोन ते तीन दिवसांत माघारी जाण्यास सुरुवात झाली नाही तर, गतिविधी संपायला आणखी काही काळ थांबावे लागेल.

त्यानंतरचे कमी दाबाचे क्षेत्र २४ ते २५ सप्टेंबरच्या सुमारास मध्यप्रदेश, गुजरात राज्यात पोचणे अपेक्षित आहे आणि अशा परिस्थितीत परातीस आपोआपच विलंब होईल.

Image Credits – The Weather Channel

Any information taken from here should be credited to Skymet WeatherFor accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×