JATIN SINGH, MD SKYMET: ईशान्य मान्सून भारतीय द्वीपकल्पात सक्रिय, नक्री मुळे १३ नोव्हेंबरनंतर गतिविधींमध्ये वाढ होईल. उत्तर भारतात पहिली बर्फवृष्टी. दिल्लीतील हवेची गुणवत्ता १५ नोव्हेंबरनंतर सुधारणार.

November 11, 2019 8:08 PM |

MD blog

गेल्या आठवड्यात भारताच्या दोन्ही किनारपट्टीजवळ चक्रीवादळे विकसित झाली आहेत- अरबी समुद्रात “महा” आणि बंगालच्या उपसागरात "बुलबुल". या दोन्ही प्रणालींमुळे या महिन्यात ईशान्य मान्सून हंगामातील पावसाळी गतिविधी कमकुवत राहिल्या. पाचही उपविभागात ऑक्टोबर महिन्यात पावसाचे अतिरिक्त प्रमाण होते परंतु नोव्हेंबरच्या बाबतीत आतापर्यंतची वाटचाल काहीशी वेगळी आहे. ईशान्य मान्सून जीवनरेखा असलेल्या तामिळनाडूमध्ये पावसाची तूट राहिली आहे. चेन्नईत नोव्हेंबरच्या पहिल्या १० दिवसांत साधारण ३७४ मिमीच्या तुलनेत केवळ ३ मिमी पाऊस पडला. तसेच पुद्दुचेरी येथे सामान्य ४०३ मिमी च्या तुलनेत फक्त २ मिमी पाऊस झाला आहे.

बुलबुल” च्या विरण्यामुळे हळूहळू भारतीय द्वीपकल्पातील ईशान्य मान्सूनचा सक्रिय होण्याचा मार्ग मोकळा होईल. उष्णकटिबंधीय वादळ “नक्री”चा शेष भाग बंगालच्या उपसागरामध्ये येईल जो १३ नोव्हेंबरनंतर मान्सून गतिविधींना आणखी गती देईल. आठवड्याच्या पूर्वार्धात हा पाऊस केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडूच्या अंतर्गत भागांपुरता मर्यादित राहील. उत्तरार्धात मात्र, पावसाचा जोर चेन्नई शहरासह तामिळनाडूच्या किनारपट्टीवर देखील वाढेल.

सक्रिय पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील पर्वतरांगांमध्ये बरीच व्यापक आणि पूर्व हंगामी बर्फवृष्टी झाली. आकाश स्वच्छ झाले असले तरी या प्रणालीच्या पार्श्वभूमीवर या भागात थंड हवामान कायम आहे. १० नोव्हेंबरला दिल्लीतील तापमान १५ अंशांच्या खाली गेले, हे हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. आठवड्याच्या पूर्वार्धात दिल्लीत तापमान कमी होण्याची शक्यता आहे आणि ते १३ अंशांपर्यंत खाली जाईल. आणखी एक पश्चिमी विक्षोभ १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान पोहोचेल ज्यामुळे उत्तरेकडील डोंगरावर हलका-पाऊस पडेल.

चक्रीवादळ “महा” हे उत्तर-पूर्व अरबी समुद्रात कमकुवत परिभ्रमण म्हणून कायम आहे. ही कमकुवत प्रणाली उपरोक्त पश्चिमी विक्षोभ यांच्या एकत्रीत प्रभावामुळे १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानात अवकाळी पाऊस पडेल, विशेष म्हणजे १३ आणि १४ नोव्हेंबरला मुसळधार पाऊस पडेल.

"बुलबुल" चक्रीवादळ बांग्लादेश ओलांडून ईशान्य भारतात जाईल आणि पुढील दोन दिवसांत या भागात विखुरलेल्या, हलक्या-मध्यम सरी बरसतील. मध्य आणि पूर्व भारतात सामान्यतः स्वच्छ आकाश आणि तापमानात किंचित घट नोंदवली जाईल.

दिल्ली हवेच्या गुणवत्तेबद्दल

दिल्लीची हवा बर्‍याच ठिकाणी खराब आणि अगदी खराब श्रेणीमध्ये पोहोचली आहे म्हणजे सरासरी एक्यूआय ३०० (पीएम २.५) आणि ७०० (पीएम १०) पेक्षा जास्त आहे - माहिती स्कायमेट एक्यूआय. काही ठिकाणी हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत असून प्रदूषण वाढण्याचे कारण हलके व बदलणारे वारे आहेत. ताज्या पश्चिमी विक्षोभामुळे वारे हळूहळू बदलू लागले आहेत आणि दिशा देखील सतत बदलत आहे. हलके वारा असल्यामुळे प्रदूषकं जे खरं तर दूर गेले पाहिजेत ते दिल्लीवरून हलू शकले नाहीत, नकाशा जोडलेला आहे जो हवेची गुणवत्ता दर्शवितो

https://www.skymetweather.com/air-quality/#/home

pollution

आम्ही आशा करतो की १५ नोव्हेंबरपर्यंत प्रदूषण राहील व हवा अत्यंत खराब श्रेणीत राहील, कारण पश्चिम हिमालय दोन सलग पश्चिमी विक्षोभांमुळे प्रभावित होणार आहे. पश्चिमी विक्षोभ येऊन गेल्यानंतर, १५ नोव्हेंबर रोजी दुपारपासून मध्यम वेगाने सामान्य वारे वाहू लागतील. यामुळे प्रदूषक कमी होण्यास मदत होईल आणि त्या काळात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होईल.

पिकांवर प्रभाव

ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी जिल्हे "बुलबुल" मुळे प्रभावित झाले आहे. खरिपाच्या भात पिकाची काढणी प्रामुख्याने दोन्ही राज्यात सुरू होणार आहे. ओडिशामध्ये नुकतीच पिकांच्या काढणीस सुरूवात झाली आहे आणि एक किंवा दोन आठवड्यांत हा वेग वाढेल. पश्चिम बंगालमध्ये भात काढणीसही प्रारंभ होणार आहे आणि या राज्यात पाऊस पडल्यास जमिनीतील ओलावा जास्त असल्याने कापणीस उशीर होऊ शकतो.

परंतु गुजरातसारख्या इतर राज्यात नोंदवलेल्या पावसामुळे पेरणीस सुरवात होण्यासाठी मातीमध्ये पुरेसा ओलावा असल्याने रब्बी पेरणीस चांगला फायदा झाला आहे.

Image Credit: India TV

Please Note: Any information picked from here must be attributed to skymetweather.com


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories
Weather on Twitter
The meteorologists at Skymet have predicted more light showers with one or two moderate spells in Coastal… t.co/eGBaojaDAB
Sunday, December 08 16:00Reply
As per the rainfall data available with Skymet, Nellore has recorded 22.7 mm of #rain, followed by Karaikal 18.1 mm… t.co/ey1qMbnZyB
Sunday, December 08 16:00Reply
By December 14, the weather will clear up. Many parts of #Bihar might experience dense #fog on December 14 and 15. t.co/101KclCdeK
Sunday, December 08 15:13Reply
Places like #Patna, #Gaya, Bhagalpur, Purnia, Buxar etc. are likely to receive scattered rains and thundershowers.… t.co/zZiOtMRnqP
Sunday, December 08 15:11Reply
A Well Marked Low Pressure Area is prevalent over Southeast and adjoining Southwest Arabian Sea. The system is expe… t.co/ux8V8H7ko0
Sunday, December 08 14:00Reply
As of today, #Amritsar in #Punjab is the #coldest #City in the plains of India, with its #night temperatures settli… t.co/g54VDE05sn
Sunday, December 08 13:55Reply
The overall AQI of #Delhi showed a little improvement today morning as it came down from yesterday’s 388 to 361. De… t.co/5NkQQMVhtH
Sunday, December 08 13:30Reply
By Dec 12, the spread and intensity of these #rains will increase and cover parts of West #UttarPradesh and #Delhit.co/5gQLY7HXfb
Sunday, December 08 12:57Reply
Scattered light to moderate rain likely in #Punjab, parts of #Haryana and North #Rajasthan including Sri Ganganagar… t.co/o8CJWV0k1a
Sunday, December 08 12:56Reply
RT @SkymetHindi: अगले 24 घंटों के दौरान तटीय तमिलनाडु और दक्षिणी तटीय आंध्र प्रदेश के शहरों में हल्की से मध्यम बारिश जारी रहने के आसार हैं।…
Sunday, December 08 12:17Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try