Skymet weather

[Marathi] नागपूर, अमरावती, अकोला, येथे आणखी पावसाची शक्यता, शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी

March 20, 2018 4:22 PM |

Maharashtra Weather

स्काय मेट वेदर च्या पूर्व  अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाने  हजेरी  लावली. पावसाचे प्रमाण आणि तीव्रता मराठवाड्यापेक्षा  विदर्भात जास्त होती.

मागील २-३ दिवसात, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान  पूर्णतः कोरडे होते.  मागील २४ तासात झालेल्या पावसामुळे, कोरड्या  आणि उष्ण हवामानापासून काही प्रमाणात सुटका झाली आणि हवामान प्रसन्न झाले.

जरी काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी, वाढणाऱ्या तापमानापासून सुटका होण्याची शक्यता कमीच आहे. सध्याचा पूर्व मौसमी  हंगाम असल्यामुळे, पूर्व मोसमी पाऊस दुपारच्या कालावधीत पडतो. त्यामुळे पावसानंतर तापमानात वाढ होते.

[yuzo_related]

स्काय मेट वेदर च्या निरीक्षणानुसार, एक कमी दाबाचा पट्टा कर्नाटक पासून मराठवाडा आणि विदर्भसहित मध्य प्रदेश पर्यत कार्यरत आहे. हवामानाच्या या स्थितीमुळे  विदर्भ आणि मराठवlड्यात पाऊस झाला आहे. सद्यस्थितीत  कमी दाबाचा पटटा पूर्वे कडे सरकत आहे. ज्यामुळे मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण कमी होईल, तर विदर्भात मात्र आणखी तुरळक पावसाची शक्यता आहे आणि त्यासोबतच वादळी वारे वाहतील.जसे कि हा पूर्व मौसमी हंगाम आहे, त्यामुळे थोड्या कालावधी साठी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.उद्यापासून हवामान स्वच्छ होईल, तसेच कमी दाबाचा पट्टा  पूर्वे कडे  छत्तीसगढ आणि ओडिशा कडे सरकत आहे.

lightning in maharashtra

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

शेतीच्या कामासाठी शिफारस

सततच्या ढगाळ हवामान आणि पावसामुळे  आंबिया बहारातील  आंबा, डाळिंब, संत्रा, द्राक्ष आणि मोसंबी फळबागेमधे  फुलगळ  आणि फळ फळ होण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे  फळबागेत  राग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवानी रोग, किडी आणि फुलगळ रोखण्यासाठी  उपाययोजना कराव्यात. उशिरा लागवड केलेल्या गहू पिकाची कापणी करावी. संत्रा,डाळिंब आणि द्राक्ष फळाची काढणी करावी. शेतकरी बांधवानी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

Image Credit: ndtv.com         

Any information taken from here should be credited to skymetweather.comFor accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×