Skymet weather

[Marathi] मुंबई, पुणे येथे कोरडे हवामान, मध्य महाराष्ट्रात भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारी पूर्वी करावी

February 8, 2018 5:58 PM |

Think-India-Mumbai 1111

चालू थंडीच्या हंगामात महाराष्ट्र राज्याने संपूर्णतः कोरड्या हवामानाचा अनुभव घेतला आहे. जानेवारी महिन्यात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहिले आणि  फेब्रुवारी महिना सुद्धा कोरडाच राहील असे वाटते.  तशाच काहीसे  हवामान  कोंकण, गोवा  आणि मध्य महाराष्ट्रात सुद्धा अनुभवण्यात आले.

मागील २४ तासांत  दिवस आणि रात्रीच्या  तापमानात बरीचशी घट झाली आहे. कमाल आणि किमान तापमान जे सरासरीच्या वर १-२ ते ४-५ अंश सेल्सिअस  होते  त्यात  बऱ्याच  प्रमाणात घट  झाली आहे.

मागील २४ तासांत, मध्य महाराष्ट्रातील सांगली, सॊलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात दिवसाच्या  कमाल तापमानात अनुक्रमे ९,७,आणि ६ अंश सेल्सिअसची  उल्लेखनीय घट  झाली आहे. त्याप्रमाणेच पुणे आणि सातारा येथे सुद्धा तापमान सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअस ने कमी होते.

[yuzo_related]

कोंकणच्या  बाजूला असलेल्या महाबळेश्वर येथे कमाल तापमान तब्बल ५ अंश सेल्सिअस  ने कमी झाले, तर रत्नागिरी येथे कमाल तापमान सरासरीच्या २ अंश सेल्सिअस खाली होते.

Maharashtra

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

स्काय मेट च्या  हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार, संपूर्ण  राज्यावर असलेल्या ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली असून, उत्तर आणि  ईशान्य  दिशेकडून येणाऱ्या  वाऱ्यांमुळे किमान  तापमानात  सुद्धा  घट झाली असे आढळून आले.

स्काय मेट च्या हवामान खात्याचा अंदाजानुसार, पुढील २४ तासांत तापमान अजून कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र गुजरात आणि दक्षिण राजस्थानावर तयार होणाऱ्या चक्रवातामुळे किमान तापमानात वाढ होईल तसेच किमान तापमान सरासरीच्यावर  जाण्याची  शक्यता आहे.

दिवसाच्या तापमानात मात्र  लक्षणीय बदल होण्याची शक्यता नसून, कोंकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात वातावरण कोरडे राहील.

वातावरणाच्या स्थितीत शेतीची करावयाची कामे

पावसाची कोणतीही शक्यता नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीस तयार पिके  हरभरा, करडई आणि ज्वारीची कापणी पूर्ण करावी. शेतकरी बांधवानी उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीच्या पूर्वी करावी.

कोंकण आणि गोव्यातील  शेतकरी बांधवानी आपल्या  आंबा  आणि  काजूच्या  फळबागांची काळजी घ्यावी. जर किडीचा प्रादुर्भाव  आढळुन  आल्यास , त्यावर  नियंत्रण  करण्यास  फवारणी  करावी. तसेच  उन्हाळी भाताची लावणी  पूर्ण करून गरजेनुसार  पिकास  पाणी  द्यावे.

Image Credit: ThinkIndia             

Any information taken from here should be credited to skymetweather.com  






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories







The advantage of staying at home on a rainy day is that you can get comfortable, turn on your mobile, and get to play at a bitcoin casino with a cup of tea. While that heavy rain is falling, you get to play your favorite bitcoin casino games without any worry in the world. The advantage of playing in a crypto casino is that you can log in anywhere at any time.

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×