Skymet weather

[Marathi] MD Skymet, Jatin Singh: मान्सून आणखी एक आठवडा सक्रिय राहणार, मध्यभारतासह उत्तर आणि पूर्व भारतात चांगला पाऊस, मुंबईत पावसाचा प्रकोप नाही. १३ ऑगस्टनंतर पावसाळी गतिविधींमध्ये कमी येईल

August 5, 2019 12:54 PM |

Monsoon in India

देशभरात हा आणखी एक आठवडा मान्सून सक्रिय असणार आहे. याचा अर्थ मध्य, पूर्व आणि उत्तर भारतातील बर्‍याच भागांत चांगला पाऊस पडेल. अंदाजानुसार, गेल्या आठवड्यात मान्सूनने अपेक्षेनुसार कामगिरी केली. मध्य भारतात सर्वाधिक पाऊस झाला असून वडोदरा, सूरत, पुणे, नाशिक आणि मुंबई यासारख्या अनेक ठिकाणी १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद केली गेली. उत्तर भारतातील कटारा, उना आणि कपूरथला येथेही मुसळधार पावसाची नोंद झाली.

आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, देशात १ जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत सरासरी ४८९. ३ मिमी पावसाच्या तुलनेत ४५३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. देशभरात पावसाची कमतरता आता ७ टक्के आहे, जी मागील आठवड्याच्या तुलनेत ५ टक्क्यांनी घसरली आहे. खाली दिलेला तक्ता आपल्याला मागील आठवड्यात आणि त्याआधी एक आठवड्यापूर्वी नोंदविलेल्या पावसाच्या प्रमाणाचे तुलनात्मक चित्र दर्शवितो.

Rainfall deficiency

मान्सून कमकुवत होणार

या आठवड्यात चांगल्या पावसाचा अंदाज लक्षात घेता ही कमतरता जवळपास २ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे पण त्यानंतर स्थिरावण्याची शक्यता आहे. आमच्या हवामान प्रारूपांमध्ये १२ किंवा १३ ऑगस्टपासून मान्सून कमकुवत होत असल्याचे दर्शविले गेले आहे. मान्सूनमधील हा खंड अधिक कालावधीसाठी म्हणजेच साधारण एका आठवड्यासाठी असेल. कमी दाबाचा पट्टा वगळता जो हिमालयाच्या पायथ्याकडे सरकून त्या भागापुरता मर्यादित राहील, या काळात कोणत्याही सक्रिय हवामान प्रणालीची अपेक्षा केली जात नाही. पायथ्याकडील भाग वगळता उर्वरित देशाच्या बहुतांश भागात या कालावधीत कोरडे हवामान राहील. तर, आम्ही असे म्हणू शकतो की १३ ऑगस्टपासून एका आठवड्यापर्यंत पावसाच्या विश्रांतीमुळे केवळ पावसाच्या कमतरतेत वाढ होईल.

मध्य भारतात मुसळधार, मुंबईत मात्र पावसाचा प्रकोप नाही

तथापि, सद्य हवामानाची स्थिती जवळजवळ एका आठवड्यापर्यंत देशात चांगला पाऊस होण्याच्या गोष्टीकडे लक्ष वेधते. मध्य भारत, त्यानंतर पूर्व आणि उत्तर भारत पावसाच्या बाबतीत सर्वोत्तम कामगिरी करणारे प्रदेश असेल. राजस्थानातील काही भागांसह काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची नोंद होऊ शकते. बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे पावसाच्या अंदाजानुसार, दक्षिण भारत, आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि केरळमध्ये अत्यल्प पाऊस पडेल.

मुंबईबद्दल बोलायचं झालं तर शहरात मुसळधार पावसाची शक्यता नाही. परंतु पश्चिम किनारपट्टीवर असल्यामुळे एक किंवा दोन मुसळधार सरींची शक्यता देखील नाकारता येत नाही.

बंगालच्या उपसागरामध्ये मान्सून ट्रफ आणि संभाव्य बनणारी प्रणाली या आठवड्यात देशातील पावसासाठी मुख्यत्वे जबाबदार असेल.

पिकांवर परिणाम

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये असलेल्या भात आणि ऊस पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरेल. तथापि, मुसळधार पावसामुळे देखील शेतात पाणी साचू शकते यामुळे कापूस आणि सोयाबीन लागवड करणाऱ्या शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगून शेतातून पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी असा सल्ला देण्यात येत आहे. या पावसाचा मोठ्या प्रमाणात पीक घेण्यात येते त्या कडधान्यांच्या पिकांनाही फायदा होईल.

एकूणच देशासाठी पावसाच्या बाबतीत हा आठवडा चांगला ठरणार आहे. परंतु मान्सूनच्या १२ किंवा १३ ऑगस्ट पासून येऊ घातलेल्या पावसाच्या विश्रांतीचा कालावधी या काळात देशभरात पावसाची कमतरता पुन्हा वाढवू शकतो.

प्रतिमा क्रेडीट: डीएनए इंडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try