[Marathi] 19 सप्टेंबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: रत्नागिरी, हर्णेमध्ये मुसळधार पाऊस; मुंबई, पुणे, डहाणू येथे चांगला पाऊस

September 18, 2017 5:08 PM | Skymet Weather Team

 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढलेला आहे. खरं तर, गेल्या २४ तासांत, संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झालेला आहे.

पुढील २४ तासांत कोकणात व मुंबई आणि उत्तर मध्य-महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होवू शकतो. 

[yuzo_related]

प्रामुख्याने पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, रायगड आणि डहाणू या शहरात मध्यम स्वरूपाच्या सरी होण्याची शक्यता असून रत्नागिरी, हर्णे, भिरा आणि महाबळेश्वर येथे मुसळधार होवू शकतो.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

तथापि, ४८ तासांनंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल अशी अपेक्षा आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES