[Marathi] चक्रीवादळ वायु ची तीव्रता अजूनही कायम, गुजरातला पावसाचा तडाखा

June 14, 2019 3:44 PM | Skymet Weather Team

चक्रीवादळ वायू चे अती तीव्र चक्रीवादळात आधीच रूपांतर झाले असून त्याची तीव्रता अजूनही कायम आहे. ही यंत्रणा सध्या एक अत्यंत गंभीर चक्रीवादळ असून अद्याप तीव्र स्वरूपाची आहे. चक्रीवादळ सध्या २१ अंश उत्तर आणि ६८. ४अंश पूर्व स्थित असून ,दक्षिण पोरबंदर पासून दक्षिणेस १३० किमी आणि कराचीच्या ४५० किमी दक्षिणपूर्व आहे.
गेल्या १२ तासांत, चक्रीवादळ १० किमी प्रतितास या वेगाने पश्चिम-उत्तरपश्चिम दिशेने वाहत आहे. त्यानंतर, हि प्रणाली पश्चिमेकडे वळेल.

सौराष्ट्र किनारपट्टीपासून दूर जात असताना हि प्रणाली आपली तीव्रता कायम राखण्याची शक्यता आहे. आम्ही सांगू इच्छितो की चक्रीवादळ वायू अद्याप शांत झाले नाही. ही यंत्रणा २४ तासासाठी आपली ताकद टिकवून ठेवेल आणि अतिशय तीव्र चक्रीवादळ म्हणून टिकून राहील. त्यानंतर, ते कमकुवत होऊन तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. काही प्रसारमाध्यमे दावा करीत आहेत की, हि चक्रीवादळाची यंत्रणा ओमानकडे जाणार नाही.

ही प्रणाली जटिल असून आगामी काळात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान हि प्रणाली पोरबंदर पासून खूप लांब अंतरावर नाही. पण अद्याप मुसळधार पाऊस पडला नाही.

गेल्या २४ तासांत मध्यम पावसाची नोंद झाली असून फक्त वेरावळमध्ये ५२ मि.मी.जोरदार पाऊस पडला आहे. पुढील २४ तासांत, दीव ते द्वारका या किनारी भागांत मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. चोवीस तासानंतर "वायू"श्रेणी १ वादळाच्या समतुल्य होईल आणि नंतर वादळ कमकुवत होणार असून उत्तर अरबी समुद्रात राहणार आहे. चक्रीवादळाला प्रतिबंध घालण्यास प्रमुख कारण अरबी समुद्रात असलेली विपरीत चक्रवर्ती प्रणाली आहे. तथापि,दोन दिवसानंतर वायव्य दिशेला एक ट्रफ तयार झाल्यामुळे प्रणाली पूर्वोत्तर दिशेने फिरेल.

त्यानंतर ४८ तासांनंतर, हि प्रणाली उत्तर-पूर्व अरबी समुद्रात राहणार असून गुजरातच्या किनारपट्टीला प्रभावित करण्याची शक्यता असून या वेळी कच्छ च्या किनारपट्टीला धडकेल. नंतर हि प्रणाली वळेल आणि द्वारकेपासून जास्तीत जास्त २५० किमी अंतरावर पश्चिम -दक्षिण पश्चिम दिशेने प्रवास करेल. त्या दरम्यान, चक्रीवादळ वायू कमकुवत होऊन कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल आणि त्या भागातच राहील.

येत्या काही दिवसांमध्ये या प्रणालीमुळे थोड्याफार पावसाची शक्यता आहे. तीन दिवसांनंतर, १७ जून रोजी, जोरदार पावसाची शक्यता असून उत्तरेकडील भागांवर १८ जून रोजी पावसाची शक्यता आहे. अशा प्रकारे, जामनगर, पोरबंदर, भूज, नलिया, द्वारका, ओखा, मांडवी या शहरांत पावसाची शक्यता आहे. गुजरात आणि कराची किनारपट्टीवर चक्रीवादळचा धोका संपला असला तरी समुद्र खवळलेला राहणार असून किनारी भागात अतिशय जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागात सावधगिरी बाळगण्याची आवशक्यता आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES