[Marathi] मान्सूनचे आगमन उशिरा होवून सुद्धा मुंबईत पावसाने २५२७.५ मिमीसह वार्षिक लक्ष्य पार केले

August 26, 2019 1:35 PM | Skymet Weather Team

मुंबई मध्ये मान्सून ची सुरुवात अतिशय मंद झाली असली तरी हंगामात झालेल्या दमदार पावसामुळे शहराने आपले वार्षिक पर्जन्यमानाचे लक्ष्य ऑगस्ट महिना संपायच्या आतच पूर्ण केले आहे.

यावर्षी शहरात जानेवारी ते मे या काळात एक मिमी देखील पाऊस पडला नाही. तसेच मार्च मध्ये वाढलेल्या तापमानाने विक्रम मोडला.

शिवाय, शहरात जूनच्या पहिल्या दहा दिवसांत देखील मान्सून-पूर्व पाऊस पडला नाही. या हंगामात मुंबईत १० जून रोजी थोडा पाऊस पडला होता, ही मुंबईत मान्सूनच्या आगमनाची सर्वसाधारण तारीख आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस जवळपास दहा दिवस चालू होता परंतु तोपर्यंत मान्सून पावसाचे आगमन झाले नव्हते. अखेर १५ दिवसांच्या विलंबाने मुंबई शहरामध्ये २५ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले.

तथापि, महिन्याच्या शेवटच्या दिवसात मुसळधार पाऊस पडला ज्यामुळे शहराने पर्जन्याची मासिक सरासरी आधीच ओलांडली.

यावर्षी जुलै ची सुरुवातच दमदार पावसाने झाली आणि महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसात मुसळधार पाऊस नोंदला गेला. वस्तुतः जुलै महिन्याची अखेर मुंबईमध्ये चार अंकी पावसासह झाली. तसेच ऑगस्टच्या पहिल्या काही दिवसांत चांगला पाऊस पडला परंतु महिन्याच्या पहिल्या दहा दिवसानंतर जोरदार पावसाने माघार घेतली.

आतापर्यंत मुंबईत २५१५ मिमी या वार्षिक पावसाच्या तुलनेत २५२७.५ मिमी पावसाची नोंद मान्सून हंगाम संपण्यापूर्वीच झाली आहे. मान्सून हंगाम संपायला अजून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असल्याने ही आकडेवारी वाढेल.

अशाप्रकारे मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला असला तरी, वर्ष संपण्यापूर्वीच मुंबईने आपल्या वार्षिक पावसाचे लक्ष्य सहजरित्या पार केले आहे.

Image Credits – India Today

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES