[Marathi] मुंबई, डहाणू, अकोला येथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता;शेतकरी मित्रांनी भात शेतातून अतिरिक्त पाणी काढून टाकावे.

July 9, 2018 4:05 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने माघार घ्यायची नाही असे पक्के केले आहे असे वाटत आहे कारण महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये अतिवृष्टी होत आहे.

कारण शहरातील अनेक ठिकाणांनी कालच्या दिवशी तीन अंकी पाऊस नोंदवला होता. व त्यामध्ये कोकण हा सर्वाधिक प्रभावित प्रदेश होता विदर्भांवरील पाऊसही खूपच जास्त होता आणि या भागातील बरेच जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा मोठा पाऊस पडला.

रविवारी सकाळी ०८;३० पासून, गेल्या २४ तासात,डहाणू येथे अतिशय जास्ती तीन आकडी पावसाची ३५४ मिमी इतकी नोंद झाली तर, मुंबई कुलाबा १७१ मिमी, ठाणे १५६ मिमी, सान्ता क्रूज़ १२२ मिमी, गोंदिया १०६ मिमी, अलिबागव ९१ मिमी, महाबळेश्वर ८७ मिमी, हर्णे ५८ मिमी, जालना ४८ मिमी, वेंगुर्ला ४० मिमी, बुलडाणा ३९ मिमी, ब्रह्मपुरी ३७ मिमी, नागपूर ३१ मिमी, रत्नागिरी २३ मिमी, यवतमाळ २२ मिमी आणि अमरावती 7 मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.

स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार गुजरात व उत्तर कोकण मध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे एक चक्री वादळ निर्माण होत आहे ,त्यामुळे सध्याचा एवढा मुसळधार पाऊस बरसत आहे. म्हणून आता पुढील ३-४ दिवस कोकणात प्रामुख्याने उत्तर कोकणातील काही भागांत मुसळधार पाऊस राहील तसेच मुंबई, डहाणू, रत्नागिरी, ठाणे आणि अलिबाग सारख्या शहरात सुद्धा जास्त पाऊस होऊ शकतो.

त्यामुळे आगामी काही दिवसात मुंबई मधील माणसांमध्ये अधिक अंदाधुंदी निर्माण होऊ शकते . विदर्भ मधील नागपूर आणि अकोला सारख्या शहरात देखील पुढील २४-४८ तासात जोरदार पाऊस होऊ शकतो.दरम्यान, मध्य महाराष्ट्र मधील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो दुसरीकडे,मराठवाडा भागांत जसे की जालना, परभणी, आणि औरंगाबाद शहरात तुलनेने कमी पाऊस असेल.

त्यामुळे, पुढील तीन ते चार दिवस, तरी महाराष्ट्र राज्याला पावसापासुन आराम मिळेल असे दिसत नाही व सुरु असलेला पाऊस उग्र स्वरूप घेऊन पुरासारखी परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हवामानाचा कृषी घटकावर होणारा परीणाम पाहू;

पाऊस महाराष्ट्रात सुरू राहणे अपेक्षित आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनी आवश्यक तेथे तांदूळ शेतात मधील जादा पाणी काढून टाकावे .भात नर्सरीमध्ये युरिया खताचा वापर करावा.कापूस पिकाला कीड लागू नये म्हणून कीडनाशकाचा उपयोग करावा . .याव्यतिरिक्त, शेतकरी बंधूनी सोयाबीन, कापूस, मका, बाजरी व तूर भात, आणि ऊस पेरणी पूर्ण करावी .तसेच उडीद / मूग / सोयाबीन / भुईमूग मका ह्यांमधील खुरपणीचे काम हाती घेतले पाहिजे.

Image Credit: Wikipedia

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.

 

OTHER LATEST STORIES