[Marathi] माथेरान, महाबळेश्वर आणि कोल्हापूर मध्ये पाऊस सुरु राहणे अपेक्षित, मॉन्सूनचे आगमन लवकरच

June 14, 2019 3:01 PM | Skymet Weather Team

चालेल्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला कोरड्या हवामानापासून सुटका मिळाली आहे. ह्याचे कारण आहे अतिशय तीव्र चक्रीवादळ वायु, जे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पाऊस देत आहे.

सध्या, ही हवामान प्रणाली महाराष्ट्र राज्याशी खूप दूर पोहोचून गेली आहे, तथापि, ह्याचे बाह्य परिधीय ढग अजूनही संपूर्ण राज्याला प्रभावित करीत आहेत. याशिवाय, दक्षिण पश्चिम दिशेने वारे संपूर्ण राज्यावर वाहत आहे.

दरम्यान एक ट्रफ रेषा कर्नाटकच्या किनारी भागांपासून केरळ पर्यंत विस्तारलेली आहे. ही ट्रफ रेषा महाराष्टाच्या किनारी भागांना पार करू जात आहे ज्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारी भागांवर मॉन्सूनच्या आगमनापर्येंत चांगला पाऊस पडत राहणे अपेक्षित आहे.

येणाऱ्या २४ तासात, माथेरान, महाबळेश्वर, वेंगुर्ला, डहाणू, सातारा, कोल्हापूर आणि सांता करुज मध्ये पावसाची शक्यता आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून, कोंकण व गोवा आणि मध्य महाराष्ट्र मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद करण्यात येत आहे.

गेल्या २४ तासात, महाराष्ट्रात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. महाबळेश्वर मध्ये ८१ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, वेंगुर्ला मध्ये ५६ मिलीमीटर, माथेरान मध्ये २७ मिलीमीटर आणि डहाणू मध्ये २४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील १० सर्वात पावसाळी ठिकाण येथे पहा:

साधारणपणे, १० जून रोजी महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन होते. परंतु, दक्षिण भारतात मॉन्सूनची प्रगती मंद असल्यामुळे, महाराष्ट्रातील रहिवाशांना मॉन्सूनच्या आगमनासाठी अजून काही वेळ प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान, मॉन्सूनच्या आगमनापर्येंत मुंबईसह संपूर्ण महाराष्टात पाऊस पडत राहणे अपेक्षित आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES