[Marathi] अरबी समुद्रात चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाऊस

June 9, 2019 3:34 PM | Skymet Weather Team

नैऋत्य मान्सूनचे केरळवर आगमन झाले असून आता मुंबईकर पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काल मुंबईत एक-दोन ठिकाणी पावसाची रिमझिम अनुभवण्यात आली असून शहर परिसरात मात्र अजूनही अत्यंत उबदार व आर्द्र हवामानाची परिस्थिती आहे.

स्कायमेटनुसार, एक ट्रफ रेषा दक्षिण महाराष्ट्रापासून केरळ किनारपट्टीपर्यंत विस्तारत आहे. शिवाय, दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि आसपासच्या भागावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. ही प्रणाली अधिक बळकट होऊन कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत उत्तर/ उत्तरपश्चिमी दिशेने मार्गक्रमण करेल ज्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागांवर आणि मुंबईसह कोकण किनारपट्टीवर गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. जसजशी ही हवामान प्रणाली आणखी तीव्र होईल ज्यामुळे कमी दाबाचा पट्टा आणखी विकसित होईल किंवा चक्रीवादळ देखील तयार होऊ शकते, याच्या प्रभावामुळे ११ जून रोजी मुंबईत पाऊस होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय,

हवामानतज्ज्ञांच्या अनुसार ११ आणि १२ जून रोजी मुंबईत बऱ्याच भागांमध्ये हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

येणारा पाऊस मुंबईकरांसाठी या हंगामातील पहिलाच पूर्वमोसमी पाऊस असेल. खरं तर, मुंबईत मान्सूनपूर्व हंगामात पावसाचे प्रमाण नगण्य असते आणि प्रामुख्याने हा पाऊस केवळ मान्सूनच्या आगमना आधीच अनुभवला जातो. असे असले तरीही पावसाला सुरुवात होत असल्याने, मुंबईकरांना आता बऱ्याच काळापासून सतावत असलेल्या उबदार आणि आर्द्र हवामानाच्या परिस्थितीतून सुटका मिळेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES