हवामान अंदाज 14 मे: काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड मध्ये पाऊस, महाराष्ट्र मध्ये हवामान मात्र कोरडेच

May 13, 2019 8:38 PM | Skymet Weather Team


उत्तर भारता पासून जर आपण सुरुवात केली तर सध्या एक पश्चिमी विक्षोभ उत्तर अफगानिस्तान आणि लगतच्या पाकिस्तानवर बनलेला आहे. या शिवाय, आधी बनलेला पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावाने जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय, मध्य पाकिस्तान आणि लगतच्या पंजाब मध्ये एक चक्रवाती परिस्थिती बनलेली आहे ज्यामुळे पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थान मधील काही भागात धुळीचा वादळासह पावसाची शक्यात आहे. तसेच, दिल्ली आणि उत्तर प्रदेश मध्ये हि एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे.

मध्य भारतात, अरब सागरापासून उष्ण वारे वाहत आहे, ज्यामुळे दक्षिण राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागात धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे. याउलट, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये हवामान मात्र कोरडेच राहणार. याशिवाय, विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगढच्या एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती बिहारवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा दक्षिण भारता पर्यंत विस्तारलेली आहे. एक आणखीन चक्रवाती परिस्थिती अरुणाचल प्रदेश मध्ये बनलेली आहे, ज्यामुळे सिक्कीम, असम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पूर्व बिहार, झारखंड आणि ओडिशा मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across India

 

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि दक्षिण आंतरिक कर्नाटकच्या जवळपास विस्तारलेली आहे, ज्यामुळे, केरळ, आंतरिक तामिळनाडू आणि दक्षिण आंतरिक कर्नाटक मध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES