हवामान अंदाज 9 जानेवारी: विदर्भात पाऊस तर मुंबईत हवामान कोरडेच राहणे अपेक्षित

January 8, 2020 7:02 PM|

उत्तर भारतापासून सुरुवात करूया, एक पश्चिमी विक्षोभ पूर्व दिशेने सरकत आहे. अशा प्रकारे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशचे हवामान कोरडे होईल. तथापि, या प्रणालीचे अवशेष उत्तराखंडच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी देतील. उत्तर प्रदेशच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वारे सुरू झाल्यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानचे किमान तापमान २ ते ४ अंशांनी घसरतील. काही भागात दाट धुके होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश ते छत्तीसगड पर्यंत एक ट्रफ रेषा विस्तारित आहे. पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशाच्या काही भागांत विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, सब-हिमालयीन पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि नागालैंड मध्ये एक -दोन ठिकाणी पाऊस पडेल. सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशच्या उच्च ठिकाणीही बर्फवृष्टी होणे शक्य आहे. कोलकाता मधील हवामान कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

मध्य भारतात, छत्तीसगड आणि विदर्भातील काही भागात ९ जानेवारी रोजी दुपारपर्यंत हलका विखुरलेला पाऊस सुरू राहील. याउलट, मध्य प्रदेश, गुजरात आणि दक्षिण राजस्थान आणि महाराष्ट्रातील उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण राजस्थानमध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मुंबईत हवामान कोरडे राहील.

शेवटी दक्षिण भारतात, पावसाची तीव्रता आणखी कमी होईल. उत्तर तेलंगाणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अजूनही एक-दोन ठिकाणी हलका पाऊस पडेल. कर्नाटक आणि केरळमध्ये कोरडे हवामान राहील. लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडेल, परंतु अंदमान निकोबारचे हवामान मात्र कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

author image