[Marathi] येणाऱ्या दिवसात दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबाद मध्ये उष्णतेची लाट

May 28, 2019 3:11 PM|

heatwave in Delhi

येणाऱ्या दिवसात, दिल्ली आणि आसपासच्या भागात कोणतीही हवामान गतिविधींची शक्यता नाही दिसून येत, खरं तर,दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद आणि गाझियाबादमध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. याशिवाय, कोणत्याही महत्वपूर्णहवामान प्रणालीच्याअनुपस्थित, उत्तर पश्चिम दिशेने गरम आणि कोरडे वारे वाहतील, ज्यामुळे तापमानात वाढ दिसून येईल.

आमची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या तीन ते चार दिवसात, पारा ४५ अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतो ज्यामुळे या ठिकाणीउष्णतेची लाटअनुभण्यात येईल.

Also read in English:Prolonged spell of heat wave condition likely in Delhi, Noida, Gurugram, Faridabad and Ghaziabad

काल दिल्ली मध्ये सगळ्यात जास्त तापमान ४१.९ अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला आहे, जे सामान्यपेक्षा २ अंशांनी जास्त आहे. येथे बऱ्याच दिवसांपासून कोरडे हवामान चालू आहे.

ह्या हंगामात, ३० एप्रिल ला सगळ्यात जास्त तापमान ४३.७ अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला होता. मे महिन्यात कमाल पारा सामान्यतः ४५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचतो.

दिल्ली मध्ये मॉन्सूनचे आगमन जून महिन्याच्या शेवट पर्यंत होते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पासून, पूर्व मॉन्सूनच्या पावसाची सुरुवात दिल्ली आणि आसपासच्या भागात होते.

तथापि, ह्या हंगामात पूर्व मॉन्सूनचे पाऊस जरा कमीच पडलेले आहे. याशिवाय, आता पर्यंत दिल्ली आणि आसपासच्या भागात चांगल्या धुळीचा वादळासह पावसाची नोंद नाही करण्यात आलेली आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

author image