[Marathi] जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेशात १० डिसेंबर पासून पुन्हा पाऊस आणि हिमवृष्टी

December 6, 2019 2:55 PM | Skymet Weather Team

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या डोंगराळ भागातील हवामान जवळपास आठवडाभर कोरडे राहणार असून आणखी चार ते पाच दिवस या प्रदेशात अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

तथापि, नव्याने येणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे लवकरच १० डिसेंबरच्या आसपास जम्मू-काश्मीर प्रभावित होण्याची शक्यता असून पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. ११ डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे. लडाख आणि उत्तराखंडमध्येही विखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे. सर्व डोंगराळ राज्यात १२ डिसेंबरपर्यंत हवामान विषयक गतिविधींमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे ज्या १३ डिसेंबरपर्यंत सुरू राहतील.

फक्त डोंगराळ नाही तर या पश्चिमी विक्षोभाचा परिणाम उत्तरेकडील मैदानी भागांवरही जाणवेल. स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी ११ आणि १३ डिसेंबर रोजी पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

पावसाळी गतिविधिंच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ आणि वायव्य मैदानी भागातील दिवसाचे तापमानात आणखी घट होईल. हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या कित्येक भागांत किमान तापमानात घट झाली असून काही ठिकाणी रात्रीचे तापमान शून्य अंशांच्या आसपास आहे. दिवसाचे तापमानही बर्‍याच ठिकाणी एक अंकी झाले आहे.

गेल्या २४ तासांत गुलमर्ग मधील किमान तापमान -५.६ अंश सेल्सियस, पहलगाम -५.६ अंश, काझीगुंड -३.१ अंश, श्रीनगर -३ अंश, लेह -१५ अंश, कल्प -१ अंश, केलॉंग -८.६ अंश आणि मनाली -१ अंश सेल्सियस नोंदले गेले.

आतापर्यंत पश्चिम हिमालयातील सर्व डोंगराळ राज्यात पाऊस जास्त किंवा अति जास्त प्रमाणात आहे. उत्तराखंडमध्ये ३०%, हिमाचल प्रदेशात ४१% आणि जम्मू-काश्मीरमध्ये १५७% जास्त पाऊस झाला आहे.

तर, आपण असे म्हणू शकतो की ऑक्टोबर महिन्यात सलग चार पश्चिमी विक्षोभांमुळे सर्व डोंगराळ राज्यात चांगला पाऊस आणि हिमवृष्टी झाली आहे.

 Image Credits – Hindustan Times 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES