[MARATHI] मान्सूनपूर्व पाऊस: महाराष्ट्रात अजून पावसाची दाट शक्यता

May 14, 2015 3:41 PM|

Rain in Maharashtra to continueमहाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे गेले काही दिवस अधून मधून येणाऱ्या पावसाची हजेरी लागतच आहे आणि अजूनही पुढचे काही दिवस असाच पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. याला कारण म्हणजे या भागातील वातावरणात मान्सूनपूर्व बदल वेगाने होताना दिसत आहेत.

भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मध्य भारतावर चक्रवाती हवेचे क्षेत्र निर्माण झालेले असून या क्षेत्राचा परीणाम हा तमिळनाडूतील भागांवर तसेच विदर्भ आणि मराठवाडा यांवर पावसाच्या स्वरुपात होत आहे.

गेल्या २४ तासात पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली दिसून आली आहे. ह्या पावसाचा जोर खूप अधिक असल्याने २४ तासात १०३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आणि या पावसामुळे पुण्यातील मे महिन्यातील आत्तापर्यंतची सर्वाधिक पावसाची नोंद झालेली दिसून आली. यापूर्वी पुण्यातील मे महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद ३१ मे १९२७ साली ८२.५ मिमी करण्यात आली होती.

सध्या मध्य भारतावर असलेली हवामान प्रणाली लक्षात घेतल्यास मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडील भाग तसेच मराठवाडा येथे पावसाचा जोर अजूनच वाढण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात तुरळक पावसाच्या सरी पुढचे ३ ते ४ दिवस सुरूच राहतील. महाराष्ट्राच्या  दक्षिणेकडील समुद्र किनारपट्टीच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात चढत्या तापमानाला थोडा आळा बसल्याचे दिसून आले कारण बऱ्याच ठिकाणी तापमान ४० अंश से. पेक्षा कमीच होते. याला कारणही सध्या वेगाने होत असलेले हवामानातील बदलच आहेत.

स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार दिवसाचे तापमान हे नेहमी असणाऱ्या तपमानापेक्षा २ ते ३ अंश से. कमीच असेल.

गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत घेतलेल्या गेल्या २४ तासात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे

maharashtra to witness more showers

Image Credit (3deviyaan.files.wordpress.com)

 

author image