[MARATHI] बंगरूळात एप्रिल महिन्यात मासिक सरासरीपेक्षा पाचपट जास्त पावसाची नोंद

April 27, 2015 5:21 PM|

Rain in Bangaloreगेले पाच दिवस बंगरूळात रोज पावसाची हजेरी लागते आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात बंगरूळात वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस म्हणजेच हलका, मध्यम तसेच जोरदार पाऊस येत आहे. सकाळी स्वच्छ उन आणि नंतर मात्र जोरदार पाऊस असे काहीसे चित्र आहे. आजही ढग दाटून येण्याची शक्यता आहे.

शहरात गेले ४ दिवस झालेल्या पावसाची नोंद हि दोन आकडी संखेतच होत आहे. गुरुवारी ५३ मिमी पावसाच्या नोंदीनंतर शहरात झालेल्या पावसाची नोंद १३० मिमी आहे. यामुळेच मासिक सरासरीत पाच पटीने वाढ झालेली दिसून येते. याचाच अर्थ आत्तापर्यंत शहरात एकूण २०० मिमी पाऊस झालेला आहे. नेहमी एप्रिल महिन्याची पावसाची सरासरी ४० मिमी असते.

एप्रिल महिना हा सर्वसाधारणपणे बंगरूळसाठी उष्ण असतो. या महिन्यातील सरासरी तापमान ३४.१ से. असते आणि हीच उष्णता आणि आर्द्रता एकत्र होऊन याचे रुपांतर पावसात होते. पण यावर्षी मात्र बंगरूळ शहर हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा अनुभव घेत आहे.

बंगरूळ शहरावर निर्माण झालेल्या ढगांमुळे आज पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. येत्या काही दिवसात बंगरूळ शहर एप्रिल २००१ साली झालेल्या पावसाची उच्चांक नोंद ३२३.८ मिमी च्या जवळपास जाण्याची शक्यता आहे, पण नवीन उच्चांकाची नोंद मात्र नक्कीच होणार नाही.

Image Credit (thehindu.com)

 

 

 

author image