Skymet weather

[Marathi] उत्तर भारतात मान्सूनच्याजोरदार पावसाची हजेरी, अजून ३ ते ४ दिवस पावसाची शक्यता

July 6, 2015 3:31 PM |

Delhi rainभारतात नैऋत्य मान्सूनचे आगमन ५ दिवस उशिरा झाले. पण त्यानंतर मात्र मान्सूनने चांगलाच वेग घेतला व जोरदार आगेकूच करीत, आपल्या सर्वसामान्य तारखेच्या आधीच म्हणजेच २५ जून पर्यंत उत्तर भारतात आगमन केले. असे झाले असले तरी उत्तर भारतात म्हणावा तसा मान्सूनचा जोरदार पाऊस हा फक्त २४ व २५ जून रोजी झाला. त्यानंतर मात्र उत्तर भारत पावसाची प्रतिक्षा करीत कोरडाच राहिला होता.

आत्ता हि प्रतिक्षा संपली असून पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिमी उत्तरप्रदेश येथे पावसाला सुरवात झाली आहे. या पावसाचे भाकीत भारतातील स्कायमेट या संस्थेतील हवामान विभागाने आधीच वर्तवले होते. रविवारी सकाळी ८.३० पासून चोवीस तासात चंडीगड येथे ७६ मिमी पावसाची नोंद झाली तर पतियाळा येथे १९ मिमी पावसाची नोंद झाली. याच काळामध्ये उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे १०० मिमी, मुरादाबाद येथे ६८ मिमी, हरदोई येथे ६७ मिमी, मुझफ्फरनगर येथे ५७ मिमी, बरेली येथे ५४ मिमी आणि मीरट येथे ४० मिमी पावसाची नोंद झाली.

भारतातील स्कायमेट या संस्थेतील हवामान विभागानुसार पाकिस्तानच्या उत्तरेकडीलभागावर आणि त्या लगतचा जम्मू काश्मीरच्या भागावर सध्या एक पश्चिमी विक्षोभ आहे. या विक्षोभाचा परिणाम उत्तर भारतातील हवामानावर होत आहे. याच्या जोडीला बंगालच्या उपसागरावर एक चक्रवाती हवेचे क्षेत्र तयार झाले आहे. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा (Monsoon trough ) या दोन ठिकाणातून जात आहे. त्यामुळे सध्या फिरोजपुर, कर्नाल, भागलपूर, बांकुरा, दिघा आणि बंगालच्या उपसागरातील वायव्येकडील भाग जोडणाऱ्या रेषेवर चांगलाच पाऊस होतो आहे.

हे चक्रवाती हवेचे क्षेत्र हळूहळू आणखीन ताकदवान होईल. या प्रणाली मुळे पूर्वेकडून येणारे वारे सुरु होऊन पाऊस अजून जोरात सुरु होईल. यामुळे पंजाब, उत्तर हरियाणा, उत्तरप्रदेशाचा हिमालयाच्या पायथ्याकडील भाग येथे येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्यम ते हलका पाऊस हा ११ जुलै पर्यंत सुरुच राहील.

या होणाऱ्या पावसामुळे तेथील पावसाची तुट भरून निघेल. आणि या सर्व भागावर पाऊस सरासरीच्या जवळ पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

 

Image Credit: Firstpost

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try