Skymet weather

हवामान अंदाज 2 जुलै: विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

July 1, 2019 8:04 PM |

सध्या एक कमी दाबाचा पट्टा छत्तीसगड आणि आसपास बनलेला आहे. एक ट्रफ रेषा उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीपासून कमी दाबाच्या पट्ट्या पर्येंत विस्तारलेली आहे. ज्यामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय,एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण गुजरात आणि लगतच्या कोंकण व गोव्यावर विकसित झाली आहे ज्यामुळे दक्षिण गुजरात, मुंबईसह कोंकण व गोव्यावर चांगल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण पूर्व राजस्थान, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मध्य प्रदेश मध्ये विखुरलेल्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

बनलेल्या हवामान प्रणालीमुळे पूर्व भागात जसे, झारखंड, ओडिशा, गंगीय पश्चिम बंगाल, उप हिमलायी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच, पूर्व बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश मध्ये काही ठिकाणी विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

दक्षिण मध्ये एक ट्रफ रेषा गुजरात पासून कर्नाटक पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे कर्नाटक आणि केरळ मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे. याशिवाय, तेलंगाणा मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपच्या पावसाची अपेक्षा आहे. याउलट, उत्तर अंतर्गत कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये काही ठिकाणी विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. याउलट, रायलसीमा आणि तामिळनाडू मध्ये हवामान गरम आणि कोरडे राहील.

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तान आणि आसपास बनलेली आहे. एक ट्रफ रेषा उत्तर पूर्व राजस्थान पासून उत्तर मध्य प्रदेश पर्येंत विस्तारलेली आहे. ज्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये गडगडाटी पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड मध्ये विखुरलेला पाऊस सुरु राहील. याउलट, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली मध्ये हवामान गरम आणि कोरडे राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try