Skymet weather

हवामान अंदाज 24 जून: मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मुंबईसह कोंकणात मध्यम पाऊस

June 23, 2019 7:53 PM |

मॉन्सूनची उत्तर सीमा रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, पेंडरा, वाराणसी आणि बह्राईचंला पार करून पुढे जात आहे.

मध्य भारतात, एक चक्रवाती परिस्थिती उत्तर पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या राजस्थानवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पूर्व मध्य बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे. एक आणखी ट्रफ रेषा तेलंगणा पर्येंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे, दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर पूर्व गुजरात मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. विदर्भ आणि छत्तीसगड मध्ये काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. याउलट, महाराष्ट्रातील उरलेल्या भागात आणि मुंबईसह कोंकणात मध्यम पाऊस पडत राहणे अपेक्षित आहे.

पूर्व भारतात, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल मध्ये उष्ण वारे वाहत आहे ज्यामुळे येथे एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे असम, उप हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

दक्षिण भारतात, एक चक्रवाती परिस्थिती कर्नाटकवर बनलेली आहे ज्यामुळे कर्नाटक आणि केरळ मध्ये पावसाची अपेक्षा आहे. तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. एक चक्रवाती परिस्थिती उत्तर पश्चिम राजस्थानवर बनलेली आहे, ज्यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये पावसाची अपेक्षा आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे.

एक चक्रवाती परस्थिती उत्तर पूर्व राजस्थान आणि लगतच्या उत्तर पश्चिम मध्य प्रदेशात बनलेली आहे. एक आणखी चक्रवाती परिस्थिती उत्तर पश्चिम राजस्थानवर बनलेली आहे ज्यामुळे राजस्थान मध्ये पावसाची अपेक्षा आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try