Skymet weather

हवामान अंदाज 24 मे: हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली मध्ये पाऊस, विदर्भ मध्ये उष्णतेची लाट

May 23, 2019 7:49 PM |

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती पाकिस्तानच्या मध्य भाग व लगतच्या पंजाब मध्ये बनलेली आहे, ज्यामुळे, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

तसेच, पंजाब मध्ये काही ठिकाणी व हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे. उत्तर पश्चिम भागांच्या तापमानात घट दिसून येईल.

मध्य भारतात, उत्तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, गुजरात, मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात आणि मुख्यतः महाराष्ट्र हवामान मात्र गरम आणि कोरडेच राहणार. खरं तर, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशच्या बऱ्याच भागात उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती बिहार आणि झारखंडवर बनलेली आहे. एक अजून चक्रवाती परिस्थिती बांगलादेश आणि लगतच्या दक्षिण असम आणि त्रिपुरा मध्ये बनलेली आहे, ज्यामुळे, असम, मेघालय, त्रिपुरा, पश्चिम बंगालच्या उत्तर भागात व सिक्कीम मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर पूर्व राज्यातील बहुतांश भाग हलका ते मध्यम पाऊस अनुभवतील.

याशिवाय, पूर्व बिहार, गंगीय पश्चिम बंगाल मध्ये काही ठिकाणी विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे, ओडिशा आणि झारखंड मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यात आहे. याउलट, पूर्व उत्तर प्रदेश मात्र हवामान कोरडेच राहणार. पूर्व उत्तर प्रदेश मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

एक ट्रफ रेषा बिहार पासून दक्षिण आंतरिक कर्नाटक पर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे केरळ, दक्षिण आंतरिक कर्नाटक मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच, तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात व तेलंगाणा मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अंदमान व निकोबार द्वीपसमूझवर मध्यम पावसाची अपेक्षा आहे. याउलट, तेलंगाणाच्या बहुतांश ठिकाणी येणाऱ्या दोन ते तीन दिवसात उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try