Skymet weather

हवामान अंदाज 3 ऑक्टोबर: महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील भागात हलका ये मध्यम पाऊस, मुंबईत हवामान कोरडेच

October 2, 2019 4:47 PM |

कालचा कमी दाबाचा क्षेत्र आता दक्षिण पश्चिम बिहार आणि त्याच्या आसपासच्या राज्यांमध्ये आहे. पूर्व आसाममध्ये चक्रवाती परिस्थिती आहे आणि उत्तर-उत्तर प्रदेश ते अरुणाचल प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालपर्यंत एक ट्रफ रेषा पसरली आहे. अशा प्रकारे, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर झारखंड, मध्य बंगाल आणि ईशान्येकडील अनेक भागांमध्ये बर्‍याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या उर्वरित भागात हलका विखुरलेला पाऊस पडू शकतो. तर ओडिशामध्ये दक्षिणेकडील भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

दक्षिण भागात, चक्रवाती परिस्थिती उत्तर तमिळनाडू आणि लगतच्या दक्षिण कर्नाटकवर कायम आहे आणि लो-प्रेशर क्षेत्राचा एक भाग कोस्टल आंध्र प्रदेशपर्यंत विस्तारित आहे. कर्नाटक, केरळ आणि लगतच्या उत्तर तामिळनाडूमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-तेलंगणा व लगतच्या आंध्र प्रदेशातही असाच पाऊस पडेल. दक्षिणेकडील द्वीपकल्पातील उर्वरित भागांमध्ये विखुरलेला हलका पाऊस कायम राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

देशाच्या मध्य भागात एक ट्रफ रेषा छत्तीसगड व लगतच्या मध्य प्रदेशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस देईल. महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील भागात हलका ये मध्यम पाऊस पडू शकतो. मुंबईत हवामान कोरडे आणि किंचित गरम राहील. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातच्या पूर्वेकडील किनारपट्टीवर विखुरलेला पाऊस पडू शकतो. कच्छ, सौराष्ट्र येथे कोरडे हवामान अपेक्षित आहे.

उत्तर भागात, एक नवीन वेस्टर्न डिस्टर्न्स उत्तर-पाकिस्तान आणि आसपासच्या भागांमध्ये आहे. जम्मू-काश्मीरच्या पश्चिम भागात तसेच, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तान आणि लगतच्या राजस्थानमध्ये आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाने राजस्थानच्या उत्तर भागात, पंजाबमधील अनेक भागांमध्ये, पश्चिम हरियाणामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या मध्य भागात आणि दक्षिण पश्चिम आणि वायव्य उत्तर प्रदेशात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत तापमानात वाढ दिसून येईल आणि सकाळी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try