[Marathi] दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर

November 17, 2019 3:24 PM|

weather in Delhi

शुक्रवारी संध्याकाळी हवेची गुणवत्ता सर्वात खराब पातळीवर गेल्याने जगातीलसर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून दिल्लीचे नाव पहिल्या क्रमांकावर आले आहे.

शुक्रवारी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एक्यूआय) ५२७ नोंदविण्यात आला, तर शनिवारी सकाळी हा निर्देशांक ५०० च्या जवळपास होता. वायु गुणवत्ता निर्देशांक हवेत प्रदूषकांच्या प्रमाणाबद्दल माहिती देतो.

शुक्रवारप्रमाणेच शनिवारची सुरुवात सुद्धा तीव्र प्रदूषित हवेने झाली. तथापि, दुपारनंतरच्या काळात जोराचे वारे वाहू लागल्याने प्रदूषणाची पातळी सुधारण्यास मदत झाली. परिणामी, शनिवारी ताश्कंद, लाहोर, हांग्जो, चोंगक़िंग सारख्या शहरांनी प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीला मागे टाकले.

सायंकाळच्या वेळी तापमानात घट झाली आणि परिणामी, एक्यूआय मध्ये वाढ झाली ज्यामुळे दिल्ली (१९८), लाहोर (२०८) आणि ताश्कंद (२६२) यांच्यासह तिसर्‍या क्रमांकावर पोहोचली.

यावर्षी १५ ऑक्टोबर रोजी दिल्लीत जीआरएपी योजना सुरू झाली होती. प्रत्येक वर्षी प्रदूषणाची पकड आणखी वाढू लागल्या सारखे होताच समान योजना राबविली जाते. यावर्षी जीआरएपीच्या लवकर अंमलबजावणी करून देखील नोव्हेंबरच्या प्रारंभी प्रदूषण ३ वर्षाच्या उच्चांकावर पोहोचले.

दिल्लीमध्ये, जेव्हा एक्यूआय आधीच ३०० पेक्षा जास्त होता तेव्हा जीआरएपी लागू केली गेली. हवाई आपात्कालीन लागू केली गेली जेव्हा ४०० ची पातळी ओलांडली गेली.

Image Credits – NDTV

Any information taken from here should be credited to Skymet Weather

Similar Articles