[Marathi] पुढील आठवड्यात बंगालच्या खाडीमध्ये हंगामाचा पहिला कमी दाबाचा पट्टा, ओडिसा, बंगाल, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशात पाऊस

August 1, 2019 3:44 PM|

Monsoon in India

या हंगामात, बंगालच्या उपसागरामध्ये जवळपास चार प्रणाली तयार झाल्या आहेत, मुख्यत: देशाच्या मध्य भागांमध्ये उद्भवलेल्या चक्रवाती प्रणाली किंवा कमी दाबाची क्षेत्र आहेत. आता, उत्तर बंगालच्या उपसागरात ४ ऑगस्टच्या सुमारास एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल अशी अपेक्षा आहे.

बंगालच्या उपसागरामध्येअसलेले मान्सून ट्रफ चे शेपूट नेहमीच चक्रवाती प्रणाली निर्मितीसाठी अनुकूल असते आणि नंतर हि चक्रवाती प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्राचे रूप घेते.

प्रणाली तयार होण्यापूर्वी फिलिपिन्सच्या सभोवताली असलेल्या दक्षिण चीन समुद्रात एक उष्णकटिबंधीय प्रणाली तयार होईल. त्यानंतर ही प्रणाली थायलंड, म्यानमार ओलांडून पूर्वेकडे जाईल आणि पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात उदयास येईल. त्यानंतर ही प्रणाली शक्यतो ५ ऑगस्टपर्यंत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल.

आतापर्यंत खाडीतील मॉन्सून प्रणाली फक्त कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत पोहोचले आहेत. ही यंत्रणा बंगालच्या उपसागरात ५ ऑगस्टपर्यंत राहील.

दरम्यान ६ ऑगस्टनंतर ही प्रणाली अंतर्गत भागाकडे वळेल ज्यामुळे पश्चिम बंगाल व त्यालगतच्या उत्तर ओडिशावर पाऊस होईल. त्यानंतर हि प्रणाली छत्तीसगड, उत्तर झारखंड आणि मध्य प्रदेशात पोहोचेल आणि या भागात पाऊस देईल. दरम्यान ही हवामान प्रणाली राजस्थानच्या काही भागापर्यंत प्रवास करणार असल्याने, ९ ऑगस्टपर्यंत दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यात पाऊस पडेल.

मागील प्रणालीच्या तुलनेत आगामी प्रणाली उत्तरेकडे मार्गक्रमण करेल परंतु ट्रफ रेषेलगत प्रवास सुरू ठेवेल.

प्रतिमा क्रेडीट: एरिज़ोना रिपब्लिक

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

author image