[Marathi] मध्य प्रदेश मध्ये उष्णतेची लाट, गरमी पासून तूर्तास सुटका नाही

May 23, 2019 3:08 PM|

Heat wave in Madhya Pradesh

यावर्षी, मध्य प्रदेश मध्ये चांगल्या पूर्व मॉन्सूनच्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. सध्या, पश्चिम मध्य प्रदेश मध्ये ३६ टक्के जास्त पाऊस पडला आहे, तर पूर्व मध्य प्रदेश मध्ये १० टक्के जास्त पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. पूर्व मॉन्सून हंगामाच्या सुरुवाती पासूनच मध्य प्रदेश मध्ये पावसाची नोंद करण्यात येत आहे.

परंतु, गेल्या काही दिवसांपासून, येथील हवामान मात्र कोरडेच राहिलेले आहे. कोरड्या हवामानामुळे, उष्णतेची लाट राज्यात परत एकदा अनुभण्यात येत आहे. पूर्व मध्य प्रदेशच्या बऱ्याच भागात तापमान ४५ अंश सेल्सिअस किंवा त्याच्या वरती नोंदवला जात आहे.

Also read in English: Heat wave to continue in Madhya Pradesh despite forecast of rain

तथापि, गेल्या काही दिवसात, राज्यातील उत्तर भागात हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे, परंतु, बहुतांश भागातील तापमान सामान्यपेक्षा जास्तच राहिलेले आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, येणाऱ्या दिवसात, राज्यातील उत्तर भागात जसे ग्वालियर, मोरेना आणि दतिया येथील एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याउलट, राज्यातील दुसऱ्या भागात हवामान मात्र गरम आणि कोरडेच राहणे अपेक्षित आहे. याशिवाय, पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेने कोरडे आणि गरम वारे राज्यावर वाहतील, ज्यामुळे, रहिवाशांना गरमी पासून त्रास होणे अपेक्षित आहे.

याशिवाय, उष्णतेच्या लाटांचा प्रभाव राज्यातील अजून काही भागांमध्ये पसरेल. खरं तर, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत हवामान कोरडेच राहणे अपेक्षित आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

Similar Articles