Skymet weather

[Marathi] महाराष्ट्रात पुन्हा एकदा अनुभवण्यात आली उष्णतेची लाट, १० मे च्या आसपास पावसाची शक्यता

May 6, 2019 5:09 PM |

Maharashtra weather

१ मे पर्येन्त महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट अनुभवण्यात येत होती. परंतु त्यानंतर चक्रीवादळ फनीच्या प्रभावामुळे, तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली. खरं तर, बहुतांश भागातील तापमानात ३ ते ४ अंशाची घट दिसून आली, ज्यामुळे रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळाला.

आता, चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर कमी झाला आहे, ज्यामुळे गेल्या २४ तासात, महाराष्ट्राच्या हवामान परिस्थितीत बदल दिसून आलेला आहे. परिणामस्वरूप पुन्हा एकदा उत्तर पश्चिम दिशेने कोरडे आणि गरम वारे वाहू लागले आहे आणि पारा पुन्हा एकदा वाढू लागला आहे.

Also read in English: Prolonged spell of rain in Uttarakhand, Himachal, Jammu and Kashmir from May 10-15

खरं तर, विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट सुरु झाली आहे आणि पारा ४५ अंश पर्येन्त ब्रम्हपुरी आणि आसपासच्या भागात पोहोचला आहे.

उत्तर पश्चिम दिशेने गरम वारे ९ मे पर्येन्त महाराष्ट्रावर वाहतील. याशिवाय, महाराष्ट्रातील बहुतांश भाग जसे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पण उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

१० मे च्या आसपास परिस्थितीत पुन्हा एकदा बदल दिसून येईल. एक ट्रफ रेषा गुजरात पासून उत्तर पूर्व अरब सागर पर्येन्त विस्तारलेली जाईल. याशिवाय, दोन वेगळ्या वेगळ्या दिशेने येणारे वारे मिळतील ज्यामुळे महाराष्ट्रवर पावसाची सुरुवात होईल.

११ मे ला पावसाचा जोर वाढेल आणि विदर्भसह मराठवाड्यात पण पाऊस अनुभवला जाईल. नागपूर, अकोला, नाशिक, परभणी, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि महाबळेश्वर मध्ये १० आणि ११ मे ला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पूर्व मॉन्सूनच्या प्रक्रियांमुळे तापमानात पुन्हा एकदा घट दिसून येईल आणि उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळेल.

प्रतिमा क्रेडिट्स: पिंटरेस्ट

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try