[Marathi] मुंबई, पुणे, सांगली, सातारा येथे जोरदार सरी बरसणार असून, येत्या २४ तासांत नाशिकमध्ये मध्यम सरींची शक्यता

October 19, 2019 3:35 PM|

लक्षद्वीप आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र थोडेसे पश्चिम / वायव्य दिशेने सरकले असून, पुढील २४ ते ४८ तासांमध्ये हि प्रणाली अधिक चिन्हांकित होईल।

एक ट्रफ रेषा महाराष्ट्रातून उत्तरेकडील भागांत विस्तारली असून, यामुळे महाराष्ट्रातील दक्षिणेकडील भागात चांगल्या प्रमाणात, तर उत्तरेकडील विखुरलेल्या भागात पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली आहे।
आज सकाळपासून मुंबईत हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. स्कायमेटकडील उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार अमरावतीत २७ मिमी, सातारा १० मिमी, सोलापूर ३१ मिमी, सांताक्रूझ २ मिमी, आणि अहमदनगर ८ मिमी, रत्नागिरी ११ मिमी पावसाची नोंद झाली।
स्कायमेटच्या हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे।

<span data-mce-type="bookmark" style="display: inline-block; width: 0px; overflow: hidden; line-height: 0;" class="mce_SELRES_start"></span>

कोकणातही मध्यम ते जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे। दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे।  हे सर्व असताना मुंबईत मुसळधार पाऊस पडेल। उद्या दुपारी मुंबईत पावसाच्या प्रमाणात किरकोळ घसरण होईल। पुणे, सांगली, सातारा येथे येत्या २४ तासांत दमदार सरी तर नाशिक, औरंगाबाद येथे मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. मात्र, नागपुरात हलका पाऊस पडेल।

२४ तासांनंतर पावसाची गतिविधी कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, येत्या दोन ते तीन दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि लगतच्या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सुरू राहणार आहे।

Image Credits – DNA India

Any information taken from here should be credited to Skymet Weather

author image