Skymet weather

[Marathi] विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या चोवीस तासात हलक्या पावसाची शक्यता

July 2, 2015 4:51 PM |

Marathwada rainविदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या ४८ तासात झालेल्या हलक्या पावसामुळे उष्ण वातावरणा पासून थोडीशी सुटका झालेली आहे आणि येत्या २४ तासात देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार बिहारवर असलेल्या हवामान प्रणाली पासून ते आंध्रप्रदेश पर्यंत एक कमी दाबाचा पट्टा आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यात छत्तिसगढ, विदर्भ आणि मराठवाडा येत असल्याने येथे हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. याच्यामुळे नागपूर, चंद्रपूर, परभणी, नांदेड आणि उदगीर येथे येत्या २ दिवसात हलका पाऊस होईल.

विदर्भ आणि मराठवाड्याच्या पावसातील तफावत.

स्कायमेट या संस्थेकडे असलेल्या माहितीनुसार जून अखेर पर्यंत ५०% किंवा त्या पेक्षाही जास्त पाऊस झालेल्या भागांमध्ये विदर्भाचा समावेश होतो. असा जास्त पाऊस झालेले इतर काही भाग म्हणजे राजस्थान, जम्मू काश्मीर आणि सौराष्ट्र व कच्छ असे आहेत. विदर्भाशेजारील मराठवाड्यात मात्र अगदी त्याच्या विरुद्ध परिस्थिती आहे कारण या भागात आतापर्यंत १२० मिमी पाऊस झालेला आहे जेंव्हा या भागातील मासिक सरासरी १४८ मिमी असते.

महाराष्ट्रातील मराठवाडा हा सर्वात आतील भाग आहे आणि हे सर्वात महत्वाचे कारण आहे कि ज्यामुळे तेथे पाऊस हा कमी पडतो. पश्चिम वा पूर्वे कडून येणारा पाऊस मराठ्वाड्यातील लातूर परभणी आणि नांदेड पर्यंत पोहचेपर्यंत कमी होऊन जातो. मराठवाड्याच्या भौगोलिक स्थानामुळे या भागात कमी पाऊस होतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही जास्त आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण म्हणजे तेथे पाणी पुरवठ्याची व्यवस्थाही चांगली नाही.

हलक्या आणि तुरळक पावसामुळे फारसा फरक जरी पडणार नसला तरी हवामान तरी थोडेसे आल्हाददायक होईल आणि गरम व आर्द्र वातावरणा पासून सुटका होईल. सध्याच्या हवामानाच्या अंदाजा नुसार विदर्भ आणि मराठवाड्यात आज पासूनच पावसाला सुरवात होईल आणि तो उद्यापर्यंत चालू राहील.

Image Credit: The Hindu

 


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Storieslatest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try