[Marathi] आज नागपूर, मुंबई आणि डहाणूमध्ये पाऊस, मुंबईतील किमान तापमान १३ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता

January 28, 2020 4:33 PM |

rain in Maharashtra

विदर्भात गेल्या चोवीस तासांत विखुरलेला पाऊस अनुभवण्यात आला असून नागपूर, गोंदिया आणि वर्धा यासारख्या ठिकाणी हलक्या सरींची नोंद करण्यात आली.

वायव्य राजस्थान ते मध्य प्रदेश पर्यंत उत्तर-दक्षिण निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा विदर्भ आणि मराठवाड्यातून जात असल्यामुळे हा पाऊस होत आहे. ही प्रणाली आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असल्याने विदर्भात आजही अधून मधून हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच वातावरण देखील अंशतः ढगाळ असेल.

याशिवाय आणखी एक कमी दाबाचा पट्टा वायव्य राजस्थानपासून गुजरातमार्गे ईशान्य अरबी समुद्रापर्यंत विस्तारत आहे. या प्रणालीमुळे मुंबई, ठाणे आणि डहाणूसह उत्तर कोकण आणि गोव्यामध्ये आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच येत्या चोवीस तासांत या शहरांमध्ये अगदी हलका पाऊस होण्याची शक्यता देखील आहे. दुसरीकडे, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र तसेच कोकण व गोव्यातील बहुतेक भागांत वातावरण कोरडेच राहू शकते.

आज रात्रीपर्यंत पावसाळी गतिविधी छत्तीसगड आणि ओडिशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्याने हवामान कोरडे होण्यास सुरवात होईल.

उद्यापासून उत्तर कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात वार्‍याची दिशा बदलण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वारा या क्षेत्रांचा ताबा घेईल, ज्यामुळे किमान तापमानात घट होईल. मुंबईतील किमान तापमानाचा पारा १३ ते १५ अंश सेल्सियस दरम्यान स्थिर राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे आल्हाददायक दिवसानंतर रात्री सुखद गारवा राहण्याची अपेक्षा आहे.

Image Credits – Nagpur oranges 

Any information taken from here should be credited to Skymet WeatherFor accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Weather Forecast

Other Latest Stories
Weather on Twitter
Tuesday, January 28 16:27Reply
मौसम विशेषज्ञों के अनुसार यह सभी मौसम गतिविधियाँ पंजाब और हरियाणा में 29 जनवरी की सुबह तक जारी रहने की उम्मीद हैं।… t.co/tfM5f6S29E
Tuesday, January 28 16:27Reply
उत्तर भारत में जारी रहेगी बारिश। पहाड़ों पर बारिश के साथ बर्फबारी तो मैदानी इलाकों में ओलावृष्टि के भी हैं आसार। पू… t.co/5uKzaJwSMz
Tuesday, January 28 16:00Reply
We expect #AQI to settle between ‘poor and very poor’ category for another 48 hours. From January 30, wind speed ma… t.co/ykUhjzD78V
Tuesday, January 28 15:48Reply
Check out the cloud build-up of rains in the last 12 hours, responsible for giving rains across India. #Weathert.co/yHfnqV60hr
Tuesday, January 28 15:38Reply
अगले 24 घंटों के दौरान पश्चिमी हिमालयी राज्यों में बारिश और बर्फबारी का सिलसिला जारी रहने के आसार हैं। इस दौरान कश्… t.co/byjIKCLPz0
Tuesday, January 28 15:34Reply
From tomorrow, wind direction is likely to change over North #Konkan and #Goa, Madhya #Maharashtra. The mercury in… t.co/DppdZCERqi
Tuesday, January 28 15:30Reply
As this system is likely to persist for some more time, intermittent light rains may continue in #Vidarbha today. T… t.co/MlCl1qqKty
Tuesday, January 28 15:20Reply
आज दिनभर इसी तरह से रुक-रुक कर हल्की वर्षा होती रहेगी। कल से मौसमी सिस्टम कमजोर हो जाएंगे और बारिश की गतिविधियों… t.co/GSMQWEjINQ
Tuesday, January 28 15:06Reply
ll these weather activities are expected until the morning of January 29 in Punjab and Haryana. However, the weathe… t.co/fFL6ZgsPU9
Tuesday, January 28 14:40Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try