Skymet weather

[Marathi] येत्या २४ तासात पुण्यात हलक्या सरींची शक्यता, ५ ऑक्टोबरच्या सुमारास मुंबईत पाऊस

October 3, 2019 3:20 PM |

Monsoon performance

गेल्या चोवीस तासांत संपूर्ण महाराष्ट्रात हवामान जवळपास कोरडेच राहिले. तथापि, उत्तर कोकण आणि गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात जसे सांगली, डहाणू आणि माथेरानमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडला.

सध्या महाराष्ट्राच्या सभोवताली कोणतीही उपयुक्त हवामान प्रणाली नाही, त्यामुळे राज्यात पावसाळी गतिविधींची अपेक्षा नाही. तथापि, येत्या २४ तासांत मध्य-महाराष्ट्रातील काही भागात तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने पुणे, औरंगाबाद, सांगली आणि सातारा येथे पावसाची शक्यता आहे.

कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान पावसाळी गतिविधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तथापि, मुसळधार पावसाची शक्यता नसून मुख्यतः विखुरलेल्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. नाशिक, सोलापूर आणि परभणीत काही ठिकाणी एक दोन चांगल्या सरींची शक्यता आहे.

मुंबईत ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान एक-दोन मध्यम सरीसह हलक्या पावसाची शक्यता असून या पावसामुळे उष्ण आणि दमट वातावरणापासून आराम मिळू शकेल आणि दसराच्या आसपास वातावरण आल्हाददायक होईल.

Image Credits – Shalu Sharma 

Any information taken from here should be credited to Skymet Weather


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Storieslatest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try