Skymet weather

[Marathi] ग्वालियर, भिंड, मोरेना, शिवपुरी, नेवारी, गुना आणि नीमच येथे धुळीचा वादळासह पावसाची शक्यता

May 12, 2019 1:03 PM |

Rain in Madhya Pradesh Jagran 1200

मध्य प्रदेशच्या उत्तर भागात गेल्या २४ तासात धुळीचा वादळासह हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील दक्षिण भाग मात्र कोरडेच राहिले व काही ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात आली. पंचमडी आणि रीवा मध्ये १ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. बाकी भागांमध्ये हलका पाऊस पडला आहे.

पावसाचे कारण आहे एक चक्रवाती परिस्थिती, जी राजस्थानच्या भागांवर उपस्थित आहे. एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, येणाऱ्या ४ ते ५ दिवसात, पावसाचा जोर मध्य प्रदेशावर वाढेल ज्यामुळे राज्यातील उत्तर व उत्तर पश्चिम भागात पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी जोर पकडतील, आणि मध्य प्रदेशचे आणखीन काही भाग देखील पाऊस अनुभवतील.

मध्य प्रदेशचे भाग जसे ग्वालियर, भिंड, मोरेना, शेवपुर, शिवपुरी, नेवारी, टिकमगढ, छतरपूर, गुना आणि नीमच या ठिकाणी येणाऱ्या ४ ते ५ दिवसात धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे.

Also read in English: Gwalior, Morena, Sheopur, Datia, Shivpuri, Satna and Sidhi to witness rain and dust storm activity

खरं तर, मध्य प्रदेशातील पूर्व भाग देखील हलका पाऊस अनुभवतील. याउलट, दक्षिण भाग मात्र गरम आणि कोरडेच राहणार, ज्यामुळे या भागातील रहिवाशांना गरमी पासून त्रास होणे अपेक्षित आहे.

आमची अशी अपेक्षा आहे की मध्य प्रदेशच्या बऱ्याच भागांच्या रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळेल, ज्यामुळे हवामानाच्या परिस्थितीत काही सुधारणा अपेक्षित आहे. परंतु खरगोण, धार, इंदूर आणि खांडवा मध्ये दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा अधिक नोंदवले जातील.

परंतु, मध्य प्रदेशचे बाकी भाग चालेल्या पावसामुळे दिवसाच्या तापमानात घट अनुभवतील.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Storieslatest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try